किरीट सोमय्या लाभार्थी, संजय राऊतांचा पुन्हा आरोप

संजय राऊत विरुध्द वाद चांगलाच रंगला आहे. त्यातच संजय राऊत यांनी ट्वीट करून किरीट सोमय्या लाभार्थी असल्याचे म्हटले आहे.;

Update: 2022-02-21 02:51 GMT

गेल्या काही दिवसात संजय राऊत विरुध्द किरीट सोमय्या वाद चांगलाच रंगला आहे. दररोज नवे आरोप आणि नवे खुलासे केले जात आहेत. तर आरोप प्रत्यारोपांनी महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच संजय राऊत यांनी पुन्हा ट्वीटरवरून किरीट सोमय्या हे लाभार्थी असल्याचा नवा आरोप केला आहे.

संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, क्रोनॉलॉजी समझिए, राकेश वाधवान हा पीएमसी बँक घोटाळ्याचा मास्टरमाईंड आहे. 2015-16 मध्ये वाधवान यांनी देवेंद्र लाढानी यांच्या खात्यावर 4.5 कोटी रुपये डिपॉझिट केले होते. तर लाढाणी हे किरीट सोमय्या यांचे भागीदार आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या हे पीएमसी बँक घोटाळ्याचे लाभार्थी आहेत. म्हणून माझा प्रश्न आहे की, नील आणि मेधा सोमय्या यांना अजूनपर्यंत ईडीने अटक का केली नाही?, असे ट्वीट करत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्या शिवसेनेविरोधात आक्रमक होत त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांविरोधात घोटाळ्यांचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या विरुध्द शिवसेना वाद रंगला आहे. त्यातच किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांनी बोगस कंत्राट मिळवून जंबो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. तर संजय राऊत यांचे मित्र प्रविण राऊत यांच्यावरही गंभीर आरोप केला होता. त्यामुळे संजय राऊत यांनी शिवसेना भवनातून किरीट सोमय्या विरोधात रणशिंग फुंकले.

शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांचे पीएमसी बँक घोटाळ्यातील राकेश वाधवान यांच्याशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. तर नील सोमय्या राकेश वाधवान यांचे भागीदार असल्याने लवकरच जेलमध्ये जातील, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी राऊत यांनी केलेले आरोप फेटाळून लावले होते. तर रश्मी ठाकरे यांच्या बंगले चोरी गेले आहेत का? असा सवाल विचारला होता. त्यामुळे किरीट सोमय्या विरुध्द शिवसेना वाद चिघळला.

त्यानंतर दररोज पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत आणि किरीट सोमय्या एकमेकांविरोधात घोटाळ्यांचे आरोप करत आहेत. त्यानुसार संजय राऊत यांनी आज ट्वीट करून किरीट सोमय्या पीएमसी बँक घोटाळ्याचे लाभार्थी असल्याचा आरोप केला आहे.

Tags:    

Similar News