भाजप प्रवेशासाठी माझ्यावरही दबाब होता, जयंत पाटील यांचा खळबळजनक खुलासा
माझ्यावर भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. मात्र मी शरद पवार यांची साथ सोडली नाही, असे जयंत पाटील म्हणाले.;
राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहेत. त्यातच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी 2019 मध्ये माझ्यावरही भाजप प्रवेशासाठी दबाव होता, असा खळबळजनक खुलासा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्यावेळी जयंत पाटील म्हणाले की, 2019 साली माझ्यावरही भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी -दबाव आणला जात होता असा खळबळजनक खुलासा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापुर जिल्ह्यातील करमाळा येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या कार्यक्रमात केला.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, राज्यात मी कधी सुडाचे राजकारण पाहिले नाही. परंतू सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर सुडाचे राजकारण सुरू आहे. तर राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. सध्या जनता सगळं पाहत आहे. मात्र योग्य वेळ अल्यास जनता मत व्यक्त करेल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
राज्यातील सरकार पाडण्यासाठी विरोधी पक्ष केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. तसेच केंद्र सरकार आपल्या सत्तेचा दुरूपयोग करून केंद्रीय यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुडाचे राजकारण केले जाते.
आतापर्यंत अनेक सरकारे आले, अनेक सरकारे गेली. पण कोणीही सत्तेवर कायमस्वरूपी राहिले नाही. तर केंद्र सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर सुडबुध्दीने कारवाई केली जात असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
केंद्र सरकार तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना कशा पध्दतीने अडकवते, हे नवाब मलिक यांनी पुराव्यानिशी दाखवले होते. त्याचाच सुड नवाब मलिक यांना अटक करून उगवला आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. तसेच 2019 पुर्वी मी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी दवाबतंत्राचा वापर करण्यात येत होता, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.