मोदी २०२४ ला पंतप्रधान झाले नाही तर 'मी भर चौकात फाशी घेईन' ; आ.संतोष बांगर वक्तव्य

या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीच होतील आणि जर पंतप्रधान झाले नाही तर हा भर चौकात जाऊन फाशी घेईल, असं वक्तव्य हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी केलं.

Update: 2024-01-11 11:50 GMT

आगामी लोकसभा निवडणूक काही महिन्यावर येवून ठेपली आहे. निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं एकत्र लढणार असून आपल्याला सरकार निवडून द्यायचं आहे. लोकसभा निवडणूक २०२४ ला छाती ठोकून मी तुम्हाला सांगतो की, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीच होतील आणि जर पंतप्रधान झाले नाही तर हा भर चौकात जाऊन फाशी घेईल, असं वक्तव्य हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी केलं.दरम्यान यावेळी त्यांनी शिवसेना (उबाठा) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १६ आमदारांच्या अपात्रेबाबत निकाल देताना एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर शिंदे गटातील नेते-कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या आनंदाला उधाण आलंय तर ठाकरे गटातील कार्यकर्ते-नेते निकालाविरोधात संताप व्यक्त करत आहेत. अध्यक्षांच्या निर्णयानंतर संतोष बांगर यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली. "संजय राऊत यांनी पूर्वीच्या शिवसेनेची पूर्णतः वाट लावली. शरद पवार यांच्या खुट्याच्या दावणीला त्यांनी शिवसेना बांधली. उद्धवसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही. राम मंदिराच्या निमित्ताने बाळासाहेबांचे स्वप्न आज साकार झालंय. आज बाळासाहेबांचा आत्मा सर्वात जास्त खूश असेल. पण तुम्ही उठसूट सोनिया गांधी, राहुल गांधींचं कौतुक करता. आज महाराष्ट्रातल्या जनतेला कळून चुकले आहे की खरी शिवसेना कोणती, खरा धनुष्यबाण कुणाचा, हिंदुत्ववादी संघटना कोणती." अशा शब्दात आमदार संतोष बांगर यांनी ठाकरेंना सडकून टीकी . शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला आपल्याला निवडून द्यायचं आहे. लोकसभा निवडणूक २०२४ ला छाती ठोकून मी तुम्हाला सांगतो की, या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील आणि जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाही तर हा संतोष बांगर भर चौकात जाऊन फाशी घेईल, असं वक्तव्य आमदार संतोष बांगर यांनी केल आहे.

Tags:    

Similar News