Kedarnath helicopter crashes : केदारनाथ यात्रेसाठी जाणारे खासगी हेलिकॉप्टर कोसळले

Update: 2022-10-18 08:59 GMT

Kedarnath helicopter crash : केदारनाथ (Kedarnath) पासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या गरुडचट्टी (Garudchatti) या ठिकाणी हेलिकॉप्टरचा अपघात (helicopter Accident) झाला. या हेलिकॉप्टरमध्ये 8 लोक प्रवास करत होते. त्यापैकी 7 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या वृत्ताला DGCA ने दुजोरा दिला आहे. त्याबरोबरच नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया (Jyotiraditya Scindia) यांनीही ट्वीट करून दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केले आहे.

केदारनाथ यात्रेसाठी यात्रेकरुंना घेऊन जाणारे खासगी हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या अपघातात एक पायलटसह यात्रेकरुंचा मृत्यू झाला. खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर येत आहे.

नागरी उड्डाण नियामक संस्था महानिदेशालय (DGCA)ने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला.

कोणत्या कंपनीचे होते हेलिकॉप्टर?

केदारनाथपासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या गरुडचट्टी या ठिकाणी आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात खराब हवामानामुळे झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags:    

Similar News