Elon Musk ने ट्वीटर खरेदीचा करार केला रद्द

Tesla कंपनीचे मालक एलॉन मस्कने ट्वीटर खरेदीचा करार रद्द केला आहे. पण याचं नेमकं कारण काय आहे? जाणून घेण्यासाठी वाचा...

Update: 2022-07-09 05:37 GMT

आंतरराष्ट्रीय कीर्तीचा उद्योजक एलॉन मस्क याने विक्रमी किंमतीत ट्वीटर खरेदी करण्याबाबत करार केला होता. मात्र त्यानंतर मस्कने आपल्या निर्णयावरून पलटी मारत ट्वीटर खरेदीचा करार रद्द केला आहे.

एलॉन मस्क याने तब्बल 44 अब्ज डॉलर इतक्या विक्रमी किंमतीत ट्वीटर खरेदी करण्याचा करार केला होता. मात्र ट्वीटरवर अनेक फेक आणि स्पॅम अकाऊंट असल्याचे कारण देत हा करार रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. मात्र याविरोधात ट्वीटर न्यायालयात धाव घेणार आहे.

एलॉन मस्क यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार मस्क यांनी 44 अब्ज डॉलरमध्ये ट्वीटर खरेदी करण्याबाबत करार केल्यानंतर ट्वीटरकडे स्पॅम आणि फेक अकाऊंटची माहिती देण्याची विनंती केली होती. मात्र अनेक विनंत्या करूनही फेक आणि स्पॅम अकाऊंटबद्दल माहिती देण्यात ट्वीटर ही कंपनी अपयशी ठरली. त्यामुळे मस्क हा करार रद्द करत आहेत. याबरोबरच ट्वीटरने मस्क यांना चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिली. ज्या माहितीच्या आधारे हा करार करण्यात आला होता, अशी माहिती मस्कच्या वकिलांनी दिली.

ट्वीटरचे चेअरमन आणि सह संचालक ब्रेट टेलर यांनी सांगितले की, कंपनीला तातडीने विलिनीकरणाची प्रक्रीया पुर्ण करायची आहे. त्यासाठी ट्वीटर न्यायालयात जाण्याची तयारी करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Tags:    

Similar News