माथेरानच्या रस्त्यांवर अखेर E रिक्षा धावली...

Update: 2022-07-28 04:48 GMT

माथेरान : चारचाकी वाहनांना बंदी असलेल्या

माथेरानमध्ये अखेर E रिक्षा रस्त्यावर उतरल्या आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार सरकारने आता माथेरानमध्ये रिक्षांची चाचणी सुरू केली आहे. प्रदूषणमुक्त वाहनांना चालविण्यास परवानगी द्यावी यासाठी स्थानिक श्रमिक रिक्षा संघटना गेली १० बारा वर्ष लढा देत होती .सर्वोच्य न्यायालयापर्यंत पोहचलेला हा लढा यशस्वी झाला आणि राज्य सरकारने तीन महिने ई रिक्षा चालवून चाचणी घ्यावी असे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार २७ जुलै रोजी माथेरान शहरातील मुख्य रस्त्यावर राज्य सरकारने पाच ई रिक्षांची चाचणी घेतली. तीन महिने या चाचण्या घेतल्या जाणार असून त्यानंतर ई रिक्षा चालविण्याबाबत अंतिम निर्णय न्यायालय घेणार आहे. मात्र ई रिक्षाची चाचणी घेण्यासाठी आलेल्या वाहनांचे माथेरानकरांनी जल्लोषात स्वागत केले.


माथेरानच्या रस्त्यावर पर्यावरण पूरक ई रिक्षा सुरु करण्यासाठी त्यांची चाचणी घेण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार रायगड जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेकडून ई रिक्षांची

खरेदी करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. पाच ई रिक्षा माथेरानमध्ये बुधवारी पोहचल्या आणि शासनाच्या नियमाप्रमाणे शासकीय स्तरावर या ई वाहनांची चाचणी घेण्यात आली. या पर्यावरणपूरक वाहनांची चाचणी घेण्यासाठी राज्य सरकारने अधिकारी वर्गाला सूचित केले होते.




 


नेरळ -माथेरान घाटरस्त्याने माथेरानच्या दस्तुरी नाका येथे पोहचलेल्या ई रिक्षांचे माथेरानकरांनी तेथे उपस्थित राहून स्वागत केले. त्यानंतर सर्व ई रिक्षा माथेरान दस्तुरी नाका येथून महात्मा गांधी रस्ता येथून चार किलोमीटर अंतर पार करीत माथेरान नगरपरिषद कार्यालय अशा चालविल्या गेल्या.

Tags:    

Similar News