महाराष्ट्रात (Maharashtra) सत्ता स्थापनेचा तिढा दिवसागणिक वाढत असल्यामुळे सध्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी (CMO)नुकतीच शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली त्यानंतर आज त्यांनी दिल्ली येथे भाजपचे(BJP) अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांची भेट घेतली.
या भेटीनंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला...
“सत्तेच्या समीकरणासंदर्भात कोण काय बोलतोय, यावर मी बिलकुल काही बोलणार नाही. भाजपमधूनही कुणी काही बोलणार नाही. महाराष्ट्राला नवीन सरकारची आवश्यकता आहे आणि ते सरकार महाराष्ट्रात निश्चितपणे बनेल याबाबत आम्ही पूर्णपणे आश्वस्त आहोत’
अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांच्या भेटीनंतर दिली आहे.
या बैठकीत काय निर्णय घेतला जातो याकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागुन होतं. मात्र, सत्तेस्थापने संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आपले पत्ते उघडले नाहीत.
त्यांनी आपण ही बैठक... शेतकऱ्यांच्या मदतीसाठी घेतल्याचं माध्यमांशी बोलतांना सांगितलं. स्वत: अमित शहा विमा कंपन्याशी बोलतील त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडुन जास्तीत जास्त मदत दिली जाईल. असं आश्वासन अमित शहा यांनी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.