देवेंद्र फडणवीस यांचा अनिल देशमुख यांच्या विरोधात हक्कभंग, काय आहे प्रकरण
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात हक्कभंग ठराव मांडला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक प्रकरणाबाबत विधानसभेत बोलताना 'माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता, असा गंभीर आरोप केला होता.
या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. काल सभागृहामध्ये बोलताना गृहमंत्र्यांनी अन्वय नाईक प्रकरणामध्ये हे प्रकरण मागचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाबलं अशा प्रकारचं धादांत्त असत्य, खोटं, दिशाभूल करणारं विधान केलं. या संदर्भात आज मी माझ्या हक्क भंगाची जी नोटीस दिली. त्या नोटीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयचं वाचून दाखवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नोंदवलं आहे. या सरकारच्या काळामध्ये जो काही एफआयआर 306 च्या अंतर्गत आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा दाखल करण्यात आला. तो प्रायमा फेसी चुकीचा आहे. तो कुठल्याही निकषात बसत नाही.
या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय आहेत. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असताना या ठिकाणी तो निर्णय मी सभागृहात सांगितला. तरीही सन्मानीय गृहमंत्र्यांनी पुन्हा तेच विधान केलं. म्हणून गृहमंत्र्यांचं विधान सर्वोच्च न्यायालयाचं अवमान करणारं, या सभागृहामध्ये माझे जे अधिकार आहे. त्या अधिकाराला बाधा आणणारं, आणि माझ्यावर प्रेशर टाकून मी या सभागृहात बोलू नये. अशा प्रकारचा प्रयत्न करणारं आहे. म्हणून मी अशा प्रकारच्या वागणूकीवर त्या ठिकाणी हक्कभंग होतो. अशा पद्धतीने सागितलं असल्यामुळे त्याच्या आधारावर आज गृहमंत्र्यांच्या विरुद्ध मी हक्कभंग दाखल केला आहे.