कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यभरातील नेते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा मिटींगमध्ये सहभागी झाले होते. तर मंत्रालयातून मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात सरकारच्या वतीनं मिटींगला हजर होते.
तर दुसरीकडे भाजप च्या वतीनं विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर सहभागी झाले होते. तसंच मनसे प्रमुख राज ठाकरे देखील मंत्रालयातून मिटींगमध्ये सहभागी झाली आहेत. शेकापच्या वतीनं आमदार जयंत पाटीलही मंत्रालयातून या बैठकीत सहभागी झाले होते.