The Kerala Story | ममता बॅनर्जींच्या प.बंगालमध्येही ‘द केरळ स्टोरी’ वर बंदी
‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शनाआधीच चर्चेत आला होता. मात्र, त्याच्या प्रदर्शनानंतर केरळचा शेजारी असलेल्या तामिळनाडूनं देशात पहिल्यांदा या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय.
The Kerala Story चित्रपटाला विरोध करणा-यांना शबाना आझमी यांनी सुनावले
मुंबई – ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून सध्या राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झालीय. तामिळनाडूतील थिएटर्स ओनर्स असोशिएशननं या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनीही चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. आता या वादात अभिनेत्री शबाना आझमी यांनीही उडी घेतलीय.
शबाना आझमी यांनी ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटाला विरोध करणा-यांना खडे बोल सुनावले आहेत. शबाना आझमी (Shabana Azmi) या ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारे आणि आमिर खान (Aamir Khan) च्या लाल सिंग चढ्ढा (Laal Singh Chaadha) या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारेही एक सारखेच. एकदा सेन्सॉर बोर्डाने चित्रपट प्रदर्शनाला मंजुरी दिल्यानंतर कुणीही अतिरिक्त घटनात्मक अधिकार होण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्लाच शबाना आझमी यांनी दिलाय.
(शबाना यांचं ट्विट)
Those who speak of banning #The Kerala Story are as wrong as those who wanted to ban Aamir Khan’s #Laal Singh Chaadha. Once a film has been passed by the Central Board of Film Certification nobody has the right to become an extra constitutional authority .
— Azmi Shabana (@AzmiShabana) May 8, 2023