सत्ता स्थापनेच्या सारीपाठामध्ये गेल्या 14 दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्या मदतीला केंद्रीय नेतृत्व धावून आलेलं दिसून येत नाही. जे अमित शाह कर्नाटक, गोवा नुकत्याच झालेल्या हरियाणा या सारख्या राज्यात संख्याबळ आपल्या बाजूनं नसतानाही सत्ता स्थापन करतात.
मात्र, महाराष्ट्रात निकाल लागून 14 दिवस उलटले तरी, अद्यापपर्यंत अमित शाह आलेले दिसत नाहीत. इतर राज्यात सत्ता स्थापनेत तत्परता दाखवणारे निखिल शाह महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेत दुर्लक्ष करत आहेत का? काय आहेत कारणं? पाहा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचं विश्लेषण