भाजपाची अवस्था.. मनी नाही भाव देवा मला पाव : सचिन सावंत

संतानी देव देहाचे मंदीर त्यात आत्मा परमेश्वर असं म्हटलं असलं तरी भारतीय जनता पक्षाच्या आत्म्यात द्वेष आणि तिरस्कार राहतो, त्यामुळचं ते मंदीराचं राजकारण करत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

Update: 2020-11-18 09:39 GMT

भाजपाची अवस्था.. मनी नाही भाव देवा मला पाव अशी झाली आहे. एका बाजूला कोरोना वाढीसाठी तबलिकींना दोषी ठरवले, आता घंटानाद करुन मंदीर उघडण्याची मागणी भाजप नेते करत होते. धर्माचा आणि मंदीराचा उपयोग राजकारणासाठी केला जात आहे, हे दुर्देवी आहे.

मंदीर उघडं करण्याचा निर्णय अनलॉकच्या प्रक्रीयेतील भाग होता. व्यवस्थित विचार करुन सरकारने मंदीरं उघडं करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच मदत व पुर्नविकास मंत्री वेडट्टीवार यांनी नोव्हेंबर अखेर सर्व सेवा खुल्या होतील अशी घोषणा केली होती. जनतेने आता जबाबदारीनं स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेऊनच मंदीरात दर्शन घ्यावं.

वृंदावनमधील बांकी बिहारी मंदीर इतक्या दिवस का बंद ठेवलं होतं आणि सर्वसामान्यासाठी अजून बंद असलेली रेल्वे सेवा कधी सुरु असा सवाल सचिन सावंत यांनी शेवटी भाजपासाठी उपस्थित केला आहे.



Full View
Tags:    

Similar News