Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी पारंपरिक नृत्य
राहुल गांधी यांनी सुरु केलेली भारत जोडो यात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात दाखल झाली. यावेळी राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले.;
राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. ही यात्रा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश , तेलंगणामार्गे महाराष्ट्रात दाखल झाली. यावेळी यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा वासूदेव, पिंगळा यांसोबतच आदिवासी नृत्य सादर करण्यात आले.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरु केली. या यात्रेदरम्यान स्थानिकांनी पारंपरिक परंपरांचे दर्शन घडवले. त्याप्रमाणेच ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होताच फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली. त्याबरोबरच आदिवासी कलाकारांनी आदिवासी नृत्य तर महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन घडवणाऱ्या कलाकारांनी वासुदेव नृत्य सादर केले.
भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी राज्यातील काँग्रेस नेते मोठ्या प्रमाणावर हजर होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यासह भारत जोडो यात्रेचे स्वागत केले.