‘प्रफुल्ल वानखेडे चं बनावट अकाऊंट उघडून पैसे मागण्याचे प्रकार ऑनलाइन चोरी पासून सावध राहा !
प्रफुल्ल वानखेडे यांच्या नावाने पैसे मागण्याचे प्रकार समोर आला आहे. गोष्ट पैशापाण्याची या पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे
यांच्या नावाने इंस्टाग्राम वर बनावट खाते उघडण्यात आले आहे. त्या इंस्टाग्राम बनावट खात्यावरून पैशाची मागणी करत असल्याचा प्रकार समोर आलाय. याची माहिती स्वतः प्रफुल्ल वानखेडे यांनी ट्विट करत दिली आहे.
प्रफुल्ल वानखेडे ट्विट करत म्हणाले की " माझ्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट खाते उघडून कोणीतरी पैसे मागत आहे. अशा प्रकारांपासून सावध रहा! कृपया कोणीही फसू नका असही वानखेडे म्हणालेत.
प्रफुल्ल वानखेडे यांच्या नावाने बनावट अकाऊंट वरून पैसे मागणाऱ्या व्यक्तीला पैसे देऊ नका. या संदर्भात मॅक्समहाराष्ट्र वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘त्या’ प्रफुल्ल वानखेडे ला पैसे देऊ नका हे शीर्षक गोंधळ निर्माण करणारे होते. या शीर्षकामुळे प्रफुल्ल वानखेडे यांना झालेल्या मनस्तापाबद्दल मॅक्स महाराष्ट्र त्यांची माफी मागत आहे. |
यावर @BooksSparsh यांनी देखील ट्विट केल आहे ते म्हणालेत की "कुणीतरी @wankhedeprafull सरांच्या नावाने instagram वर id बनवून पैशांची मागणी करत आहे, सर pls look into..🙏 अस ट्विट करण्यात आले आहे