'या' 7 बॅंकांचे आजपासून IFSC कोड बदलले, तुमच्या बॅंकेचा समावेश आहे का?




Online Banking वाल्यांचे होणार वांदे,कसा मिळवणार IFSC कोड? तुम्ही जर या बॅंकांचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.


Update: 2021-04-01 12:46 GMT



आज पासून देशातील ७ बॅकांचा IFSC कोड बदलणार आहे. १ एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होते. या आर्थिक वर्षात या ७ बॅकांचा IFSC कोड बदलणार आहे. बॅंकाच्या विलिनीकरणामुळे या बॅंकांचे आयएफएससी कोड बदलले आहेत. यामध्ये देना बॅंका Dena Bank, विजया बॅंक Vijaya Bank, कॉर्पोरेशन बॅंक Corporation Bank, आंध्रा Andhra Bank, ओरिएंन्टल बॅंक ऑफ कॉमर्स Oriental Bank of Commerce, युनायटेड बॅंक, United Bank आणि अलाहाबाद Allahabad Bank या बॅकांचा समावेस आहे.



काय आहे IFSC कोड?



IFSC Code आयएएफसी म्हणजेच इंडियन फायनान्शिअल सिस्टम कोड. ऑनलाईन व्यवहार करताना या कोडचा अधिक वापर केला जातो. त्यामुळं जे लोक ऑनलाईन व्यवहार करतात आणि या बॅकांचे ग्राहक आहेत. त्यांनी आपल्या शाखेचा कोड मिळवणं गरजेचं आहे. 

IFSC कोड हा एक ११ अंकी कोड असतो. Reserve Bank Of India कडून प्रत्येक बॅंकेला हा कोड दिला जातो. IFSC कोडच्या सुरुवातीला सुरुवातीच्या चार अक्षरात बॅंकेचं नाव असते. त्यानंतर पाचवा अंक हा शून्य असतो
उर्ववरीत सर्व अंक त्या बॅकेच्या शाखेचा नंबर असतो.



कसा मिळवाल IFSC कोड?


तुमच्या बॅंकेच्या कस्टमर केअर हेल्प डेस्क ला कॉल करा. अथवा तुमच्या बॅंकेच्या शाखेला भेट दया. अथवा तुमच्या बॅकेच्या वेबसाईटला भेट दया.

Tags:    

Similar News