अमृता फडणवीस यांचा मुख्यंमत्री उध्दव ठाकरे यांच्यावर पुन्हा हल्ला
अमृता फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांना ठरकी म्हणणारे ट्वीट डिलीट केल्यानंतर पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर ट्वीट करून हल्ला केला आहे.;
अमृता फडणवीस या महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेमुळे कायम चर्चेत असतात. त्यातच त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात ट्वीट केले होते. त्यावर प्रतिक्रीयांचा पाऊस पडला. त्यामुळे अखेर अमृता फडणवीस यांनी ते ट्वीट डिलीट केले होते. तर त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निशाणा बनवत ट्वीट केले आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, थोडक्यात उत्तर द्यावे. तसेच उत्तर हे दिलेल्या पर्यायातून एक किंवा अधिक पर्याय निवडून द्यावे. या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस यांनी प्रश्न विचारला आहे की, उध्वस्त ठ.. ने कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा? तर या प्रश्नासाठी चार पर्याय देण्यात आले आहेत. १)वसूलीच्या ताब्यात २) विकृत आघाडीच्या ताब्यात ३) लोडशेडिंगच्या ताब्यात ४) ट्राफिक जाम आणि अव्यवस्थेच्या ताब्यात आणि ५) गुंडांच्या ताब्यात असे पर्याय दिले आहेत. त्यामुळे डिलीट केलेल्या ट्वीटनंतर अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्वीट केले होते डिलीट
माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या ट्विटवर सक्रीय असतात. शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत संसार मांडल्यानंतर अमृता फडणवीस यांनी सातत्याने ट्विटरवरुन शिवसेनेवर प्रहार सुरू ठेवले आहेत. आतापर्यंत अमृता फडणवीस यांनी सातत्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली होती. पण त्यांनी कधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका केली नव्हती. पण शनिवारी रात्री अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले, त्यामध्ये "उध्वस्त ठरकीने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?" असे एका ओळीचे ट्विट केले होते.
किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट केले. या ट्विटची गंभीर दखल घेतली गेली आणि काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलीट केले. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी हे ट्विट का डिलीट केले अशी चर्चा सुरू झाली आहे, की त्यांना कुणीतरी हे ट्विट डिलीट करण्यास भाग पाडले असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण भाजप आणि सेना यांच्यातील संघर्ष कितीही टोकाला गेला तरी भविष्यात शिवसेनेशी तडजोड होऊ शकते, अशी आशा देवेंद्र फडणवीस यांना होती, पण अमृता फडणवीस यांनी फडणवीस यांच्या या आशेचे दोरच कापून टाकले आहेत. आता भविष्यात उद्धव ठाकरे यांच्याशी मैत्रीचे सूर जुळवण्याचा फडणवीस यांचे मनसुबे पार उधळले गेले आहेत, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. फडणवीस यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते आहे.
अमृती फडणवीस यांनी ९.४७ मिनिटांनी ते ट्विट केले होते, त्यानंतर काही वेळात ते ट्विट डिलीट केले आणि रात्री १२ वाजून २० मिनिटांनी त्यांनी आणखी एक ट्विट केले, "कभी लिख देते है, कभी मिटा देते है हम, पर सच का आईना, बेख़ौफ़ दिखा देते है हम !" असे म्हणत आपण उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर ठाम असल्याचे संकेत दिले. त्यामुळे फडणवीस यांनी युतीची गड पुन्हा उभे करण्याचे दोरच अमृता फडणवीस यांनी तोडून टाकल्याची चर्चा आहे.
अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर राजू परुळेकर यांनी व्यक्त केले मत
" काल @fadnavis_amruta यांनी एक ट्वीट केलं नि डिलिट केलं. त्याबद्दल काही 'सोवळे' लोक त्यांचा निषेध करताहेत. त्यांनी ते ट्वीट डिलिट करायला नको होतं. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने कुणी का लिहिलं नाही? नि भाषेच्या सोवळेपणाबद्दल म्हणाल तर…
आपले संयमी व सुसंस्कृत मुख्यमंत्री मा. उद्धवजींचे वडिल मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक भाषणात अनेक राजकीय,विदुषी स्त्रियांबाबत(ऊदा. पुष्पा भावे) अत्यंत शिवराळ भाषणं केलेली आहेत. याच लोकांनी 'ठाकरी भाषा'म्हणून तेव्हा त्या असभ्य "अभिव्यक्तीचं"कौतुक केलेलं आहे. फॅसिझम विरोधतला स्वातंत्र्याचा लढा असा Selective होऊ शकत नाही.अमृता फडणवीस या महिला आहेत म्हणून त्यांना Soft target बनवलं गेलं.यापुढे त्यांनीही स्वतःच्या अभिव्यक्तीवर खंबीर रहायला हवं. 'ठाकरी'भाषेचं कौतुक करणारे दुटप्पी एका महिलेला असं ट्रोल करताहेत. यासाठी आपला लढा नाहीये." असे आवाहन त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केले आहे.
अमृता फडणवीस यांनी डिलीट केलेल्या ट्वीटवर आलेल्या प्रतिक्रीयांवर बोलताना म्हटले की, बाळासाहेब के नाम पर करते हे सब रास लीला है, मैं करू तो साला कॅरॅक्टर ढीला है, असे ट्वीट केले होते.
अमृता फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांना ठरकी म्हटल्यानंतर आलेल्या प्रतिक्रीयांमुळे ट्वीट डिलीट केले. मात्र त्यानंतर पुन्हा एक ट्वीट करत अमृता फडणवीस यांनी आपली भुमिका मांडली होती.
कभी लिख देते है, कभी मिटा देते है हम, पर सच का आईना, बेख़ौफ़ दिखा देते है हम ! Good night #Maharashtra असे ट्वीट केले होते.
अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्वीटमुळे वाद निर्माण झाला आहे. त्यातच पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने भविष्यात भाजप सेना एकत्र येण्याची शक्यता मावळली असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.