मुंबईतील कुर्ल्यामध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेमधील मृतांची संख्या १० झाली आहे. कुर्लापूर्व मध्ये नाईक नगर भागात ही इमारत कोसळली होती. मुंबई महापालिकीने दिलेल्या माहितीनुसार कुर्ला येथील इमारत कोसळण्याच्या घटनेमध्ये आणखी ६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता १० झाली आहे. तर या घटनेत १३ जण जखमी झाले होते. यापैकी ९ जणांचे उपचार पूर्ण झाले असून ४ जणांवर उपचार अजून सुरू आहेत. चार मजल्यांची ही इमारत सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास कोसळली आहे.
कुर्ला येथील इमारत कोसळण्याच्या घटनेमध्ये ६ मृत्यूंची नोंद झाली असून एकूण मृतांची संख्या आता १० झाली आहे.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 28, 2022
१३ जखमींपैकी ९ जणांचे उपचार पूर्ण झाले असून ४ जणांवर उपचार अजून सुरू आहेत.#MyBMCUpdates https://t.co/EJUD3PZW6e
ढिगाऱ्याखालून २३ जणांना सुखरुपपणे काढल्याचे सांगितले जाते आहे. दरम्यान ही इमारत धोकादायक असल्याची नोटीस महापालिकेने बजावली होती. या इमारतीचा एक भाग कोसळला आहे, तर दुसरी विंगही पडण्याची शक्यता व्यक्त होते आहे. दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही घटना घडल्यानंतर रा६ २ वाजता जाऊन पाहणी केली होती. तसेच दुपारी मंत्रिमंडळ बैठकीआधीही त्यांनी या ठिकाणी जाऊन बचावकार्याची माहिती घेतली.