मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मौन बाळगलं होतं पण अखेरीस त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते सोडलं. शिवसेनेच्या वाट्याला हा इतका संघर्ष का येतो या प्रश्नाचं उत्तर देताना उध्दव ठाकरे यांनी शिवसेना आणि संघर्ष एकमेकांच्या पाचवीला पुजलेले आहेत असं सांगितलं.