मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मौन बाळगलं होतं पण अखेरीस त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते सोडलं. बंडाची बातमी केव्हा समजली या राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उध्दव ठाकरेंनी माझी हालचाल बंद होती आणि तुमची हालचाल सुरू होती असा वाक्यप्रयोग बंडखोर आमदारांबाबत केला.