राष्ट्रवादीने पहिल्यादांच आमदार झालेल्या आदिती तटकरे यांना मंत्रीमंडळात संधी दिली आहे. विशेष म्हणजे आदिती तटकरे यांच्याकडं देण्यात आलेली बहुतेक खाती उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडील माहिती व जनसंपर्क तर आदित्य ठाकरे यांच्याकडील पर्यटन आणि राजशिष्टाचार या खात्याच्या आदिती राज्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.
त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आदितीला राज्यमंत्री म्हणून पसंती दिली असल्याचं दिसून येत आहे.
हे ही वाचा
मनसेच्या झेंड्याचा रंग बदलणार? कसा असेल झेंडा?
आदित्य ठाकरे असते तर मी मंचावर नसतो – उमर खालिद
CAA च्या रस्त्यावरच्या लढाईला, आता भाजपचं डिजीटल उत्तर
तर दुसरीकडे विचार केला असता उद्योग खनिकर्म ही शिवसेनेच्या सुभाष देसाई यांच्याकडं असलेली खाती, आणि शिवसेनेचे संदिपानराव भुमरे यांच्याकडील फलोत्पादन या खात्याच्या त्या राज्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. त्यामुळे एकंदरीत शिवसेना नेतृत्वाने आदिती तटकरे यांना राज्यमंत्री म्हणून पसंती दिल्याचं दिसून येत आहे.