“पंकजा मुंडे पक्ष सोडणार अशी बातमी कोणी लावली? याचा शोध घ्यावा तसंच कोअर कमिटीमधून मला मुक्त करावं,” असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आज कोअर कमीटीचा राजीनामा दिला आहे.
हे ही वाचा
भाजपचे ‘हे’ माजी आमदार करणार शरद पवार यांच्या वाढदिवशी राष्ट्रवादीत प्रवेश
राज्यातच नेत्यांची तिकिटं कापली गेली : पंकजा मुंडे यांचा गौप्यस्फोट
पंकजा मुंडे पदासाठी दबाव आणतात. या चर्चेला पुर्णविरोम देण्यासाठी मी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमीटीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचं पंकजा यांनी सांगितलं.
आज गोपिनाथ गडावर माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते दिवंगत गोपिनाथ मुंडे यांची जयंती सोहळा पार पडला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर, पाशा पटेल यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे उपस्थित होते.
यातील बहुतेक नेत्यांच्या भाषणाचा जर रोख पाहिला तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच होता. दरम्यान या सर्व घडामोडी पाहता भाजपचा अंतर्गत वाद समोर आला आहे.