मुंबईपासून २०० किलोमीटरवर हिंजेवाडीला आयटी पार्क होऊ शकतं, तर अलिबाग, खालापूर सारख्या भागात का होऊ शकत नाही? आयटी प्रकल्प जर मोठ्या प्रमाणावर अलिबाग सारख्या भागात आले. तर इथल्या पर्यटन व्यवसायाबरोबरच या भागातील जनतेच्या विकासाला निश्चित अशी दिशा मिळेल, आणि स्थानिक बेरोजगारीची समस्या निवारण व्हायला हातभार लागेल. परंतु त्यादृष्टीने इथले लोकप्रतिनिधी काही पावलं टाकतात का? पाहा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांच्याशी या संदर्भात केलेली खास बातचित