VIDEO : रिक्षा चालकाला निवडणुकीतील भाषणाबाबत काय वाटतं?

Update: 2019-10-14 16:11 GMT

विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाला यश मिळावे म्हणून प्रत्येक पक्षातील नेते दररोज मोठ मोठी आश्वासन देणारी भाषण करतात, मात्र, या भाषणाबदद्ल सध्याच्या शहराची स्थिती बद्दल नागरिकांना काय वाटतं हे मॅक्समहाराष्ट्रची टीम सध्या महाराष्ट्रभर जाणून घेत आहे.

या संदर्भात पुण्यातील एका रिक्षाचालकांशी झालेला हा संवाद नक्की पाहा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा

मुळा मुठा नदीत सांडपाणी सोडलं जातंय. तेच पाणी धरणात जात असेल तर पुण्यातील लोक हे सांडपाणीच पिताय. भाज्याही याच पाण्यावर वाढत आहे.

मोदी म्हणाले होते, आम्ही नद्या स्वच्छ करु. पण कोणालाच काही पडलेलं नाही. लोक येतात आणि भाषण करुन जातात. १५ आॅगस्ट ते २६ जानेवारी अशीच भाषण असतात. लोकांचा चांगली काम करणारी माणसं नकोय.

शिवसेना सत्ते असली तरी भाजपच्या विरोधातच आहे. वेळोवेळी ते भाजपची चांगली जिरवतात.

Full View

Similar News