झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गायब
माजी मंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भोसरी MIDC भूखंड जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या झोटींग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मंत्रालयातून च अहवाल गहाळ झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.;
भोसरी MIDC भूखंड खरेदी संदर्भात चौकशीसाठी झोटिंग समिती नेमण्यात आली होती. या अहवालात एकनाथ खडसे यांना झोटिंग समितीने क्लीन चिट दिली असल्याचं बोललं जातंय,
झोटिंग समितीचा अहवाल ईडीकडे सादर करावयाचा होता. मात्र अहवाल मिळाला नाही तर, खडसेंच्या अडचणीत वाढ होणार आहे.
भोसरी MIDC जमीन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर एकनाथ खडसेंना 12 खात्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर तातलकीन भाजप शिवसेना युती सरकारचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणीवस यांनी न्यायमूर्ती जोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. दरम्यान जोटिंग समितीने या प्रकरणात आपल्याला क्लिनचीट दिल्याचं खडसेंनी अनेकदा माध्यमांसमोर सांगितलं होतं.
खडसें कुटुंबियांची प्रतिक्रिया -
मंत्रालयातून झोटिंग समितीचा अहवाल गायब झाला अश्या बातम्या आल्यावर याबाबत
एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसें यांच्या शी संपर्क केला असता आपण मुंबई ला जात असून ह्या बाबत काहीच सांगता येणार नाही आणि यावर आपण प्रतिक्रियाही देऊ शकत नसल्याचं रोहिणी खडसें यांनी सांगितलं.
एकनाथ खडसेंशी संपर्क साधण्याचा प्रयन्त केला मात्र मात्र संपर्क होऊ शकला नाही .