UP cabinet : 34 खात्यांना एकच मंत्री 'मुख्यमंत्री योगी'

उत्तर प्रदेशमध्ये भाजपने पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आहे. तर योगी आदित्यनाथ यांच्या 2.0 या मंत्रीमंडळात 18 कॅबिनेट आणि 14 स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्र्यांसह 20 राज्यमंत्र्यांनी 25 मार्च रोजी शपथ घेतली.;

Update: 2022-03-29 04:03 GMT

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपने सत्ता स्थापन केली. तर दुसऱ्यांदा योगी आदित्यनाथ यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. मात्र या शपथविथी समारंभात 32 खात्यांची जबाबदारी एकाच मंत्र्यावर देण्यात आली आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीनंतर आता उत्तरप्रदेश मंत्रीमंडळाला खातेवाटप करण्यात आली. त्यामध्ये उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे ग्रामविकास, ग्रामिण अभियांत्रिकी, अन्नप्रक्रीया, करमणूक कर, सार्वजनिक उपक्रम आणि राष्ट्रीय एकात्मता या सहा खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर योगी मंत्रीमंडळातील दुसरे उपमुख्यंमत्री ब्रिजेश पाठक यांना आरोग्य आणि शिक्षण यासारख्या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतःकडे 32 खात्यांची जबाबदारी ठेवली आहे. त्यामध्ये गृह, नियुक्ती, कार्मिक, सतर्कता, गृहनिर्माण आणि शहर नियोजन, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, नागरिक आपुर्ती, अन्न आणि औषध प्रशासन, खनिकर्म, अर्थ, राज्य कर आणि नोंदणी, सामान्य प्रशासन, सचिवालय प्रशासन, गोपनियता, माहिती प्रसारण, निर्वाचन, संस्थात्मक वित्त, नियोजन, राज्य संपत्ती, उत्तर प्रदेश पुनर्गठन समन्वय, प्रशासनिक सुधारणा, कार्यक्रम कार्यान्वयन, अवस्थापना, भाषा, मदत व पुनर्वसन, लोकसेवा प्रबंधन, भाडे नियंत्रण, राजशिष्टाचार, सैनिकी कल्याण, नागरी उड्डाण आणि न्याय व विधी विभाग या 32 खाते योगी आदित्यनाथ यांनी स्वतःकडे ठेवले आहेत.






 

कोणाला कोणते मंत्रीपद-

  • ब्रिजेश पाठक- आरोग्य आणि औषधमंत्री, शिक्षण
  • स्वतंत्र देव सिंह- जलशक्ती मंत्रालय
  • लक्ष्मी नारायण चौधरी- ऊस विकास मंत्री
  • धरमपाल- पशूधन आणि दुग्ध विकास मंत्री
  • बेबी राणी मौर्य- महिला व बालविकास मंत्री
  • जतीन प्रसाद- सार्वजनिक बांधकाम मंत्री
  • केशव प्रसाद मौर्य- ग्रामिण अभियांत्रिकी मंत्री
  • आशिष पटेल- तंत्रशिक्षण मंत्री
  • दयाशंकर मिश्रा- वाहतूक मंत्री
  • कपीलदेव आग्रवाल- व्यावसायिक शिक्षण मंत्री
  • नितीन अग्रवाल- उत्पादन शुल्क मंत्री
  • ए के शर्मा- नगरविकास मंत्री आणि अतिरीक्त उर्जा विभाग
  • संजय निषाद- मत्स्यपालन मंत्री
  • असीम अरुण- समाजकल्याण मंत्री, अनुसूचित जाती आणि मनुष्यबळ विकास मंत्री
  • सुरेश खन्ना- अर्थ आणि संसदीय कामकाज मंत्री
  • सुर्य प्रताप शाही- कृषी मंत्री
  • जयवीर सिंग- पर्यटन मंत्री
  • नंद गोपाल नंदी- औद्योगिक विकास आणि निर्यात मंत्री
  • भुपेंद्र चौधरी- पंचायत राज मंत्री
  • अनिल राजभर- कामगार आणि रोजगार समन्वय मंत्री
  • ए.के.शर्मा- नगरविकास आणि नागरी सर्वांगीण विकास मंत्री
  • योगेंद्र उपाध्याय- उच्च शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री
  • धरमवीर प्रजापती- कारागृह आणि गृहरक्षक मंत्री
  • संदीप सिंह- मुलभूत शिक्षण मंत्री
  • गुलाब देवी- माध्यमिक शिक्षण मंत्री
  • दयाशंकर मिश्रा- आयुष आणि अन्न सुरक्षा मंत्री





 



 



योगी सरकारच्या 2.0 या मंत्रीमंडळात 52 मंत्र्यांचे मंत्रीमंडळ तयार करण्यात आले आहे. तर त्यापैकी 32 खाते योगी आदित्यनाथ यांनी स्वतःकडे ठेवले आहेत.


Tags:    

Similar News