ए चूतिया - योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ यांनी पत्रकाराला दिली शिवी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…

;

Update: 2021-04-05 05:22 GMT

देशातील नामांकित न्यूज एजन्सी ANI च्या पत्रकाराला मुलाखत देत असताना कॅमेरा हलला म्हणून उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'ए चूतिया' अशी शिवी दिली आहे. 

योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ युथ कॉंग्रेसचे नेत श्रीनिवास बीव्ही यांनी ट्वीट केला आहे.

या व्हिडीओमध्ये योगी आदित्यनाथ कोरोना व्हॅक्सीन मोफत दिल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आरोग्यमंत्र्यांचे आभार मानतात. या व्हिडीओच्या चित्रीकरणादरम्यान काही तांत्रीक अडचण निर्माण झाली. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी त्या पत्रकाराला असभ्य भाषेचा वापर केल्याचं दिसून येतंय.



हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे.

या आधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीच्या आधी पाणी आणून देणाऱ्या कर्मचाऱ्याला अपमानास्पद पद्धतीने हाकलून दिल्याचा व्हिडीयो सोशल मिडीया वर व्हायरल झाला होता. लोकांसमोर आपला चांगला चेहरा जावा म्हणून प्रयत्न करणारे अनेक राजकीय नेते कॅमेरामागे मात्र अशा पद्धतीने वागताना दिसतात अशी टीका समाजमाध्यमांवर होताना दिसत आहे.



Tags:    

Similar News