YogiAdityanathयोगी आदित्यनाथ यांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट

मुंबई भेटीवर आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (YogiAdityanath) यांनी गुरुवारी (दि. ५) सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BhagatsinhKoshayari)यांची राजभवन मुंबई येथे राज्यपालांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.;

Update: 2023-01-05 05:49 GMT

मुंबई भेटीवर आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (YogiAdityanath) यांनी गुरुवारी (दि. ५) सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BhagatsinhKoshayari)यांची राजभवन मुंबई येथे राज्यपालांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

राज्यपालांच्या विनंतीवरून योगी आदित्यनाथ यांनी राजभवनातील ब्रिटिश कालीन भुयारात निर्माण करण्यात आलेल्या 'क्रांतिगाथा' या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या संग्रहालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या( Chhtrapati ShivajiMahaj) मूर्तीपुढे नतमस्तक होऊन शिवरायांना अभिवादन केले. उपस्थित अधिकाऱ्यांकडून त्यांनी संग्रहालयातील सर्व क्रांतिकारकांची माहिती जाणून घेतली.

आदित्यनाथ यांनी भूमिगत संग्रहालयाबाहेर समुद्रकिनारी असलेल्या श्रीगुंडी देवीचे दर्शन घेतले व उपस्थितांसोबत देवीची आरती केली. यावेळी त्यांनी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ध्यानमग्न भगवान शिवाच्या मूर्तीचे दर्शन घेतले.

Tags:    

Similar News