यशोमती ठाकूर यांच्या हस्ते महिला बचत गटांना सुमारे 3 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत
महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत आयोजित विविध उपक्रमाचा शुभारंभ आज अमरावती येथे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या विविध उद्योगांसाठी मंत्री यशोमति ठाकुर यांच्या हस्ते कर्ज वितरीत करण्यात आले.
यावेळी जिल्हयातील 115 गटांना 2 कोटी 91 लक्ष रुपये प्रदान करण्यात आले. तर वैयक्तिकरित्या तीन बचत गटांना म्हणजेच लोणी येथील आम्रपाली स्वयंसहायता बचत गटाला 7 लक्ष पन्नास हजार रुपयांचा, अचलपूर येथील आशिर्वाद तर दर्यापूर येथील दुर्गा स्वयंसहायता बचत गटाला प्रत्येकी 7 लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वाटप ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी, स्वयंसहायता बचत गटांना भाजीपाला विक्री ई-कार्ट रिक्षा चे सुद्धा वाटप करण्यात आले.