मनोहर भिडे प्रकरणी यशोमती ठाकूर आणि देवेंद्र फडणवीस आमने- सामने

Update: 2023-08-02 12:05 GMT

महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मनोहर भिडे विरोधात आमदार यशोमती ठाकूर यांनी अमरावती येथे आंदोलन केले होतं. दरम्यान या आदोलनानंतर त्यांना तुमचा दाभोलकर करु अशी धमकी ट्विटर द्वारे देण्यात आली होती. त्यामुळे आज अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले. या मुद्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

दरम्यान, यावर आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या की, "मनोहर कुलकर्णी नावाचा जो व्यक्ती आहे. ज्याला भिडे गुरुजी असं म्हटलं जातं ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, महापुरुषांवर आक्षेपार्ह विधान केलं होतं, त्याला आम्ही विरोध केला. त्यानंतर मला ट्विटरद्वारे धमकी देण्यात आल्याचं आमदार ठाकूर यांनी सभागृहाला सांगितलं.

धमकी देणाऱ्यानं म्हटलं की, दाभोलकर असाच ओरडत होता. एक दिवस जन्नतमध्ये पाठवला. आम्ही धारकरी कोथळे बाहेर काठतो. लक्षात असू द्या दाभोलकर असाच ओरडत होता त्याला टराटरा फाडून टाकला. हरामखोर कोण आहे बाई हे स्पष्ट करा ? अशा पद्धतीची धमकी देण्यात आली होती. ही धमकी कैलास सूर्यवंशी नावाचा च्या हा माणसानं ट्विटरवरून दिली आहे. त्यांनी म्हटलं की आम्ही दाभोलकरांना मारलं आहे त्याची कबुली याठिकाणी त्यांनी दिली आहे, याकडेही आमदार ठाकूर यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. दरम्यान, माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण असा थेट प्रश्नच आमदार ठाकूर यांनी विधानसभा अध्यक्षांना विचारला.

दरम्यान, यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "यशोमती ताईंना पूर्ण सुरक्षा देण्यात येईल. आणि ज्यांनी धमकी दिली आहे त्याला शोधून काढून जेलमध्ये टाकण्यात येईल असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं.

Tags:    

Similar News