Tripura: महिला पत्रकारांच्या विरोधात गुन्हा दाखल, महिला पत्रकारांचा त्रिपुरा पोलिसांवर धमकावल्याचा आरोप, नक्की काय आहे प्रकरण?

नक्की काय घडतंय त्रिपुरात? त्रिपुरा हिंसाचार प्रकरणात सरकारने 70 लोकांच्या विरोधाच UAPA का दाखल केला आहे?;

Update: 2021-11-14 10:56 GMT

विश्व हिंदू परिषद आता ईशान्येतही पाय पसरत आहे आणि तेथील लोकांनाही लक्ष्य करत आहे. यावरून हे समजू शकते की त्रिपुरा पोलिसांनी विहिंपच्या तक्रारीवरून दोन महिला तरुण पत्रकारांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांना धमक्या दिल्याचेही या महिला पत्रकारांचे म्हणणे आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या तक्रारीवरून त्रिपुरा पोलिसांनी समृद्धी सकुनिया आणि स्वर्ण झा यांची चौकशी केली. पोलिसांनी त्यांना हॉटेलबाहेर पडू दिले नाही, असा दावा पत्रकार सकुनिया यांनी केला आहे.

एनडीटीव्हीने या संदर्भात दिलेल्या वृत्तांत पोलिसांनी या दोन महिला पत्रकारांना नोटीस बजावली आहे. त्यांनी 21 नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे.


पत्रकारांचं म्हणणं काय?

त्रिपुराच्या दुर्गा बाजार भागात मस्जीदमध्ये तोडफोड झाली नाही. असं सरकारचं म्हणणं आहे. मात्र, स्वर्णा झा यांनी स्थानिकांशी या संदर्भात चर्चा करुन एक ट्वीट केलं आहे.

बोलल्याचा दावा केला आहे. त्यांनी ट्विट केले,

काल रात्री पोलिस आमच्या हॉटेलच्या बाहेर आले. आमच्याशी बोलले नाहीत. मात्र, आज सकाळी आम्ही हॉटेलमधून बाहेर पडत होतो. त्यांनी आम्हाला तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती दिली आणि धर्मनगर पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले.

त्यांनी एफआयआरची एक प्रत शेअर केली आहे. दुसर्‍या एका ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की विश्व हिंदू परिषदेने एक रॅली आयोजित केली होती, ज्यामध्ये त्यांनी स्थानिक लोकांशी बोलण्यासंदर्भात माहिती दिली आहे.

सकुनिया यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे.

"आम्हाला आगरतळाच्या बाहेर जायचे होते, पण आमच्या सहकार्यानंतरही आम्हाला तसे करण्याची परवानगी दिली नाही. आमच्या हॉटेलच्या बाहेर 16-17 पोलिस उभे आहेत."


तसंच त्यांना त्रिपुराची स्टोरी कव्हर करताना कसं "धमकावलं" गेलं याची माहिती लवकरच देणार असून त्यांना हॉटेलमधून बाहेर पडू दिले जात नाही, आम्ही लवकरच कायद्याची मदत घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सरकारने वृत्त फेटाळले...

शनिवारी गृहमंत्रालयाने त्रिपुरातील मशिदीत तोडफोड झाल्याची घटना नाकारली होती. "त्रिपुरातील गोमती जिल्ह्यातील कोक्राबन भागात एका मशिदीची तोडफोड आणि नुकसान झाल्याची बातमी येत आहे. हे वृत्त खोटे असून तथ्ये चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली आहेत."

असं सरकारने म्हटलं होतं.

त्रिपुरातील हिंसाचाराच्या प्रकरणी, राज्य सरकारने एफआयआरची नोंद केली आहे. आणि सोशल मीडियावर लिहिणाऱ्या, बोलणाऱ्या काही पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखला केला आहे. यामध्ये 70 हून अधिक लोकांचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण?

पत्रकार श्याम मीरा सिंह यांच्यावरही यूएपीए लावण्यात आला आहे. पत्रकार श्याम मीरा सिंह यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील वकील अन्सार इंदोरी आणि वकील मुकेश यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या दोन्ही वकिलांनी या घटनेचं सत्य जाणून घेण्यासाठी त्रिपुराचा दौऱा केला होता. या लोकांनी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.


याचिकेत या प्रकरणाची सुनावणी करण्याच्या मागणीसह UAPA अंतर्गत नोंदवण्यात आलेले एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.

यापूर्वी त्रिपुरा उच्च न्यायालयाने हिंसाचाराची स्वत:हून दखल घेतली होती. फॅक्ट फाइंडिंग टीमचे सदस्य म्हणून गेलेल्या वकिलांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

श्याम मीरा सिंह यांचे म्हणणे आहे की, त्यांनी या प्रकरणात तेच सांगितले आहे. जे त्रिपुरा उच्च न्यायालयाने देखील सांगितले आहे. त्यांनी एनडीटीव्हीला सांगितले की जर एखाद्या पत्रकाराने न्यायालयाने जे सांगितले आहे. त्यावर भाष्य केलं तर यूएपीए लावला जात आहे. देशात लोकशाही असेल तर आम्ही अजिबात चिंतीत नाही. असं मत श्याम मीरा सिंह यांनी व्यक्त केलं आहे.

Tags:    

Similar News