काँग्रेसला सोबत घेऊनच विरोधकांची मजबूत फळी उभी राहू शकते, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली आहे. यावर शिवसेनेतर्फे संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही देखील हेच बोललो होतो. दोन दिवसांपूर्वी सामना मध्ये आम्ही हेच बोललो होतो. या देशात विरोधकांची जी मजबूत फळी उभी करण्याचं काम सुरू आहे ते काँग्रेस शिवाय हे पूर्ण होऊ शकत नाही. काँग्रेस पक्षाचे नेते दिनेश गुंडोराव यांनी देखील शिवसेनेच्या भूमिकेचा संदर्भ दिला आहे. या देशातील विरोधी पक्ष एकत्र आला तरच राजकीय पर्याय उभा राहू शकतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.