तिसऱ्या आघाडीत कॉंग्रेस नसेल तर शरद पवारांची तिसरी आघाडी भाजपची 'बी' टीम ठरेल?

गेल्या दहा दिवसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची दोनदा बैठक होऊन आज तिसऱ्या आघाडीची चाचपणीसाठी बिगर NDA आणि UPA बैठक होत असल्याने ही भाजपसाठी बीटीम तर होणार नाही ना? अशा शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवल्या जात आहेत.;

Update: 2021-06-22 07:58 GMT

आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती म्हणूनराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक बोलवली आहे.

गेल्या दहा दिवसांत शरद पवार यांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचीही दोन वेळा भेट घेतली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार विरोधकांना एकत्र करत तिसरी आघाडी उघडण्याचा प्रयत्न तर करत नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे.

या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, यशवंत सिन्हा, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दूल्ला, संजय सिंह, डी.राजा, के.टी.एस. तुलसी, संजय झा या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे.

विशेष म्हणजे राजकीय नेत्यांबरोबरच सामाजिक क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती आणि पत्रकारांना देखील या बैठकीत सामावून घेण्यात आलं आहे.

न्यायमूर्ती ए.पी.सिंह, करन थापर, जावेद अख्तर, सुधींद्र कुलकर्णी, के.सी.सिंह, के.टी.एस. तुलसी, संजय झा, इ. नेते, अर्थतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारही बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

शरद पवार यांच्या भूमिकेविषयी नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. शरद पवार हे अनप्रेडिक्टेबल नेते असल्याचं दिल्लीच्या वर्तुळात सांगितले जाते.

2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर तातडीने बिनशर्त भाजपाला पाठिंबा देण्याची त्यांची कृती चांगलीच अंगाशी आली होती.

विशेष म्हणजे आजच्या बैठकीपासून शिवसेना आणि काँग्रेस अलिप्त राहिले असल्याने ही एनडीए आणि यूपीए वगळून तिसरी आघाडी तर नाही अशी शंका उपस्थित होत आहे.

2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचे सलग यश आता विरोधकांचा चिंतेचा प्रश्न ठरला आहे.त्यामुळेच निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी भाजपला पर्याय म्हणून नवी स्टेटेजी निश्चित केली आहे.

कोरोनाच्या संकटात नियोजनाच्या पातळीवर मोदींचे अपयश आणि लॉकडाऊनच्या फटक्यात सर्वसामान्य लोकांना झालेला त्रास भविष्याची रणनीती ठरू शकतात.प्रशांत किशोर यांनी नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकांमध्येही राजकीय रणनीती आखली होती. यामुळे आगामी 2024 लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार तिसरी आघाडी उघडणार असल्याचीही चर्चा सुरू आहे.

या बैठकीवर काँग्रेस आणि शिवसेनेकडून सूचक प्रतिक्रिया आल्या असून भाजप आणि मोदींचा करिष्मा संपवण्यासाठी विरोधक यशस्वी ठरतील का? हेच आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags:    

Similar News