झुकेगा नही साला ! बच्चू कडूंचा इशारा कुणाला ?

Update: 2023-08-09 03:20 GMT

प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्या मोर्चाची महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे. अमरावतीत त्यांनी आपल्याच सरकारविरोधात शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आवाज उठवला. नाही परवा सत्तेची कारण चिंता आहे शेतकऱ्यांची, बच्चूभाऊ शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मैदानात “झुकेगा नही साला”… असं या बॅनर्सवर लिहिलं आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालया समोरच हे बॅनर्स झळकले आहेत. त्यामुळे सध्या हे पोस्टर्स चर्चेचा विषय झाले आहेत.

आ. बच्चू कडू हे त्यांचच सरकार विरोधात उभे राहिले आहेत.आज अमरावतीत बच्चू कडू यांनी जन एल्गार मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चात शेतकऱ्यांच्या एकूण 10 मागण्या करण्यात येणार आहे. अमरावतीपाठोपाठ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हे मोर्चे काढणार असल्याच बच्चू कडू यांनी केली आहे.

आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून बच्चू कडू यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलं आहे. अमरावतीतील संत गाडगेबाब यांच्या समाधीपासून मोर्चाची सुरूवात होणार आहे. या मोर्चात 10 ते 15 हजार शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात दिली.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?

शेतीची पेरणी ते कापणीपर्यंतची कामं मनरेगातून व्हावीत, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळावं, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत नुकसानभरपाई मिळावी, कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करावं यासह विविध मागण्यांसाठी हा एल्गार मोर्चा काढण्यात येणार असल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मागण्यांवर सकारात्मक विचार करतील अशी आशा आहे. मोर्चा म्हणजे सरकारचा विरोध नाही, तर चळवळ आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Tags:    

Similar News