एकनाथ खडसेंच्या गावात सरपंचपदासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला?

Update: 2021-01-18 07:41 GMT

जळगाव : राज्यातील दिग्गज नेत्यांच्या गावांमध्ये ग्रामपंचायतीवर कुणाचा झेंडा फडकणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पण नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांच्या कोथळी गावात थोडी थोडी वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

त्यात 5 जागांवर शिवसेना पुरस्कृत उमेदवार निवडून आले आहेत, तर उर्वरित 6 जागांवर राष्ट्रवादी व भाजप समर्थक असलेले उमेदवार निवडून आलेले आहेत. शिवसेना पुरस्कृत 5 उमेदवारांच्या विरोधात निवडून आलेले 6 उमेदवार हे आपले समर्थक असल्याचा दावा एकनाथ खडसेंच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे यांनी केला आहे. या ठिकाणी दोन्ही गटाला समसमान जागा मिळाल्याने सरपंच नेमका कोणत्या गटाचा असेल, याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान या ग्रामपंचायतीवर खडसे परिवाराची सत्ता आली असल्याचा दावा भाजपच्या खासदार आणि एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांनी केला आहे. कोथळी ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जात होती. अकरा जागांसाठी निवडणूक होती. यातील एक अपक्ष उमेदवार हा बिनविरोध निवडून आला आहे.

शिवसेनेला पाच जागांवर यश संपादन करता आले आहे. कोथळी ग्रामपंचायतीची निवडणूक ही खडसे परिवाराची शिवसेनेविरुद्ध निवडणूक होती व या गावांमध्ये खडसे परिवाराला मानणारा हा खूप मोठा वर्ग आहे अशी प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News