महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका पाच टप्पयात सुरु असतांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विस्मृतीत का गेल्या असा सवाल आता विचारलाय जातोय. लोकसभेच्या निवडणुकीत खासदार आणि नंतर विधानसभेच्या निवडणुकीत आमदार निवडणून येणार आहे. मात्र त्यांना निवडूण आणण्यासाठी तळातला कार्यकर्ता रात्रंदिवस झटत आहे. याच कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनतेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असते. मात्र ती सुद्धा त्यांच्यासपासून हिरावल्या गेल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात नाराज आहे. त्याचा फटका लोकसभेच्या उमेदवारांना बसतो आहे का ? मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी चर्चा केलीय ज्येष्ठ पत्रकार प्रवीण धोपटे यांच्याशी...