विकासाच्या मुद्द्यावर बोलणाऱ्या साधुंना `म्यूट`का केले ?

संसदेचा मार्ग असलेली उत्तरप्रदेशाची विधानसभा निवडणुक पुढील वर्षी पार पडणार आहे. निवडणुकपूर्व हिदुत्वाचे राजकारण करण्यासाठी भाजपनं घाईघाईनं अपूर्ण काशी विश्वेशर कॉरीडॉरचे उद्घाटन करुन घेतलं. आता या विकासाच्या राजकारणावर स्थानिक साधूंनी आवाज उठवल्यानंतर एक वृत्तवाहीनीच्या अॅंकरने त्यांचा आवाज दाबल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून आगामी उप्रदेशची विधानसभा निवडणुक मोदी- योगीसाठी सोपी नसल्याचे स्पष्ट संकेत देत आहे;

Update: 2021-12-15 03:48 GMT

संसदेचा मार्ग असलेली उत्तरप्रदेशाची विधानसभा निवडणुक पुढील वर्षी पार पडणार आहे. निवडणुकपूर्व हिदुत्वाचे राजकारण करण्यासाठी भाजपनं घाईघाईनं अपूर्ण काशी विश्वेशर कॉरीडॉरचे उद्घाटन करुन घेतलं. आता या विकासाच्या राजकारणावर स्थानिक साधूंनी आवाज उठवल्यानंतर एक वृत्तवाहीनीच्या अॅंकरने त्यांचा आवाज दाबल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून आगामी उप्रदेशची विधानसभा निवडणुक मोदी- योगीसाठी सोपी नसल्याचे स्पष्ट संकेत देत आहे.

संसदेचं आधिवेशन सुरु असताना संसद हल्ल्यातील शहीदांना आंदराजंली वाहण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसी दौऱ्याचं नियोजन केलं. काशी विश्वेश्वर कॉंरीडॉर उद्घाटनाच्या निमित्तानं दिवसभर सर्व शासकीय आणि खासगी वृत्तवाहीन्यांनी या कायक्रमाचे थेट प्रक्षेपण केलं. एबीपी न्यूज या वृत्तवाहीनीनी त्या दिवशी काशी विश्वनाथ कॉंरीडॉरमुळं भाजपला किती फायदा होईल असा प्रश्न वृत्तवाहीनीवरुन उपस्थित केला होता. पोलमधे ५३ टक्के लोकांना जास्त २० टक्के लोकांना थोडा तर अजिबात फायदा होणार नाही असं सागणारे २७ टक्के लोक दाखवत होते.

ABP News ने वार्तांकन करताना येथील साधू संतांच्या प्रतिक्रिया घेतल्या मात्र, ज्यावेळी साधूंनी केवळ काशी विश्वनाथ कॉरिडोरचा विकास महत्वाचा नसून उत्तर प्रदेश हे खूप मोठे राज्य आहे असा मुद्दा उपस्थित केला तेंव्हा ABP News ने संबंधित साधूंचा आवाज म्युट केला. हाच धागा पकडत सोशल मीडियावरून ABP News वर जोरदार टीका होताना दिसत आहे. मोहम्मद जुबेर या युजर्सने याबाबतचा व्हिडिओ ट्विट करत म्हटले आहे की, 'जैसे ही पंडित जी के विकास के बारे में बोलना चालू किया, चैनल ने उन्हें म्यूट कर दिया और हटवा दिया' असं ट्विट केलं आहे. सोबतच याबाबतचा एक व्हिडिओ या युजर्सने ट्विट केला आहे.

अॅंकर रोमाना इसार खान या निवेदन करत असून स्थानिक रिपोर्टर साधुंशी चर्चा करताना व्हिडीओमधे दिसत आहे. देवतांचा विकास करुन भागणार नाही. महागाई, बेरोजगारीचे मुद्दे देखील निवडणुकीत असतील. राजकारणात धर्म नसावा. फक्त हिंदुच संकटात का असतात? भाजप धर्माच्या नावावर विकासाचं राजकारण करत आहे. काशी मुक्तीकेंद्र आहे. इथं आलेल्याना गंगा मुक्तीच्या दिशेनं नेते. भाजप देखील आणि सत्तामुक्त होईल असं सांगताना एक साधु दिसत आहे. अॅंकर अॅंकर रोमाना इसार खान या सांधुना बोलण्यापासून रोखताना दिसत आहे, आणि भाजपचं गुणगाण करत चर्चेचा शेवट करताना व्हिडीओमधे दिसून आल्या आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटीझन्स धर्माचे राजकारण महत्वाचे की विकासाचे राजकारण असे प्रश्न उपस्थित करत आहेत.

Tags:    

Similar News