बीडमध्ये घडलेल्या घटनेमुळेच मी राजकारणात- रुपाली ठोंबरे पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मॅक्स वूमन कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना आपण राजकारणात का आलो त्याचं कारण सांगितलं. यावेळी रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, बीडमध्ये घडलेल्या घटनेमुळेच मी राजकारणात आले. पण खरंच बीडमध्ये नेमकं काय घडलं होतं? ज्यामुळे रुपाली पाटील ठोंबरे राजकारणात आल्या? जाणून घेण्यासाठी वाचा....
रुपाली ठोंबरे पाटील यांच्या घरची परिस्थिती अत्यंत चांगली होती. अगदी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलो, अशी आमच्या घरची परिस्थिती होती, असं रुपाली ठोंबरे पाटील सांगतात. पण वयाच्या 15 व्या वर्षी वडिलांचे निधन झाले. त्यानंतर वर्षभरातच आपलं कसं होईल? या विवंचनेत मोठ्या बहिणीचं निधन झालं. त्यानंतर सगळं कुटूंबच अडचणीत सापडलं होतं. पण रुपाली पाटील हॉलीबॉलपटू होत्या. त्या विविध स्पर्धेत भाग घेत होत्या. त्याच वेळी बीडमध्ये माझं राष्ट्रीय खेळाडू म्हणून सिलेक्शन झालं होतं. पण एका राजकारण्याने रुपाली पाटील नाव खोडून एका दुसऱ्याच मुलीचं नाव त्यामध्ये टाकलं. त्यावेळी मला कळेनाच की मी एवढ्या सगळ्या गोष्टींशी तोंड देत असताना हे आणखी एक का? हा विचार मनात आला. त्या गोष्टीमुळे मला प्रचंड वाईट वाटलं आणि तीच गोष्ट मला राजकारणात येण्यासाठी महत्वाची ठरली, असं रुपाली पाटील सांगतात.
पुढे बोलताना रुपाली पाटील म्हणाल्या, त्यावेळी मला वाटलं की, माझ्या वेळेला कोण नाही. पण इतरांवर जेव्हा वेळ येईल, तेव्हा कोणीतरी असलं पाहिजे. हाच विचार घेऊन मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला असल्याचे रुपाली पाटील ठोंबरे म्हणतात.
पूर्ण कॉन्क्लेव्ह पाहण्यासाठी पहा