मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांचं महत्त्व संसदीय कामकाजात अत्यंत महत्त्वाचं असतं. विधीमंडळाच्या कामकाजात आणि सभागृहाबाहेर देखील विरोधी पक्षनेत्याला त्याच ताकदीचं महत्त्व असतं. मात्र, महाराष्ट्रात सध्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत विरोधकांकडूनच कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपत आलं तरी अजूनही महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय करता आलेला नाही.
पहा काँग्रेसच्या ६ सहा दिग्गज नेत्यांची बलस्थानं आणि कच्चे दुवे आणि काँग्रेसचा विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोण असू शकतो ते... विजय गायकवाड यांच्या explainer च्या माध्यमातून...