राज्याच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याच्या दृष्टीने केंद्रीय संस्थांमार्फत माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापेमारी केल्यानंतर त्यांचे स्वीय सचिव यांना अटक करण्यात आली आहे यातून अनिल देशमुख सध्या तरी 'सेफ' असले तरी ममता बॅनर्जी मी ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये आकांडतांडव केले होते तसे महाराष्ट्रात का झाले नाही? उद्धव ठाकरे का ममता बॅनर्जी का बनू शकत नाही? असे प्रश्न देखील उपस्थित होत आहेत.
केंद्रीय संस्थांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आणण्याचे सुरू केले आहे. काल दिवसभर सक्तवसुली संचलनालय (ईडी) कडून त्यांच्या नागपूर व मुंबईमधील निवास्थानी छापेमारी करण्यात आल्यानंतर, आज (शनिवार) त्यांचे पीए संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही कालच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. काल दिवसभर अनिल देशमुख यांच्या संबंधित ठिकाणी ईडीने झाडाझडती घेतली होती.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर तुमच्या नेत्यांना सीबीआयने अटक केले होते. कोलकात्याच्या निजाम पॅलेसमध्ये ठेवण्यात येणार होतं. पक्षाच्या नेत्यांच्या अटकेची बातमी समजताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तडक सीबीआयचे कोलकात्यातील कार्यालय गाठून आठ तास ठिय्या आंदोलन केलं होतं.
सचिन वाजे प्रकरणात मुख्यमंत्र्यांना चुकीचं ब्रीफिंग केल्यामुळे मागील अर्थसंकल्पी अधिवेशनात चांगलीच गोची झाली होती. अंटालिया मनसुख हिरेन प्रकरण अंगाशी आल्यानंतर स्वतःहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला.
राजीनामा दिल्यानंतरही त्यांच्या मागील दुष्टचक्र थांबलेले नाही.काळा पैसा आणि १०० कोटींच्या वसुली प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यापूर्वीही मुंबई येथे देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी झाली होती. त्याशिवाय केंद्रीय अन्वेषण विभागानेही त्यांच्या घरी छापे टाकले होते. पुन्हा ईडीने छापे टाकल्याने देशमुख अडचणीत येऊन हाच त्यांच्या स्वीय सहाय्यक यांना देखील अटक करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल देशमुख यांना तूर्तास अटक होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणावर शांत बसून होत असून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया देण्या व्यतिरिक्त काही केले नाही.
महा विकास आघाडीच्या तिनी पक्षांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याने एकामेकाच्या प्रश्नावर बोलण्याचे टाळले जात आहे. महा विकास आघाडी म्हणून भाजपला शह देण्यात कुठेतरी कमी पडत आहेत अशी ही भावना आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांवर हल्ले होत असताना काँग्रेस देखील शांत आहे.
अनिल परब रवींद्र वायकर यांच्या नंतर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातही ईडी आणि सीबीआय वापरण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यामुळे देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून देशमुख यांची केंद्राच्या विविध पथकांकडून चौकशी सुरू आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात स्फोटकांची गाडी उभी करण्याच्या प्रकरणात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भूमिका संशयास्पद होती. पदावरून हटविण्यात आल्याच्या रागातून त्यांनी आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. आयुक्तपदी असताना ते गप्प का होते, असा सवाल करीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. आघाडीतील तिन्ही पक्षाचे नेते चौकशीच्या फेऱ्यात अडकले असताना मुख्यमंत्री आता तरी पुढे काय भूमिका घेतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. गृहमंत्री आणि देशमुख यांना सीबीआयने अकरा वाजता चौकशीसाठी बोलावले आहे त्यानंतर त्यांना चौकशी करून सोडले जाणार की अटक होणार हा देखील प्रश्न आता उपस्थित झाला आहे.