भारतात दोन लोकांच्या लग्नाविषयी सातत्यानं विचारणा होत असते. एक म्हणजे बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खान आणि दुसरं नाव म्हणजे Most Eligible Bachelor अर्थात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं. विशेष म्हणजे या दोघांनीही वयाची पन्नाशी ओलांडलेली आहे. तरीही त्यांच्या लग्नाविषयी कित्येकांना उत्सुकता आहे. सध्या राहुल गांधी यांच्या लग्नाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय. लग्न हा खासगी विषय असला तरी तो राहुल गांधी यांच्याबाबतीत लग्न हा विषय राजकीय दृष्टिकोनातूनही पाहावा लागेल...त्यामुळं काँग्रेसनचं राहुल गांधी यांचं लग्नाविषयी भाष्य करणारा व्हिडिओ शेअर केलाय...राहुल गांधी सध्या ५३ वर्षांचे आहेत...त्यामुळं इतक्या वर्षात त्यांना लग्नासाठी सुयोग्य मुलगी सापडली नाही का ? दुसऱ्या बाजूनं विचार केला तर लग्न हा इतका महत्त्वाचा चर्चेचा विषय आहे का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा...
नमस्कार मी...........मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत...
राजीव आणि सोनिया गांधी यांच्या पोटी १९ जून १९७० रोजी राहुल गांधी यांचा जन्म झाला. या दांपत्याला प्रियंका नावाची मुलगी देखील आहे... राहुल हे प्रियकांपेक्षा २ वर्षांनी मोठे आहेत. प्रियंका यांचा विवाह रॉबर्ट वॉड्रा यांच्यासोबत झाला असून त्यांना दोन मुलंही आहेत...मात्र, राहुल गांधी यांनी अजूनही लग्न केलेलं नाहीये...राहुल गांधींची एक मैत्रिण होती, तिच्यासोबत त्यांचं ब्रेकअपही झालं होतं, अशी माहिती सॅम पित्रोदा यांनी एका भारतीय युट्युबरला दिलेल्या मुलाखतीत दिली होती...राहुल यांची ती मैत्रिण छोट्या-छोट्या गोष्टींवर पैशांची उधळपट्टी करत होती, हे राहुल यांना आवडलं नाही आणि त्यांनी तिच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला...याचा अर्थ राहुल गांधी हे कंजूस आहेत असा नाही...त्यांचा स्वभाव हा साधा आणि प्रेमळ आहे...राहुल यांच्यासाठी प्रेम आणि जिव्हाळा हा सर्वात महत्त्वाचा आहे...असं सॅम पित्रोदा यांनी सांगितलं...पित्रोदा यांनीच एकदा राहुल गांधींना विचारलं होतं की, तुम्हांला कशी मुलगी पत्नी म्हणून पाहिजे...त्यावर राहुल यांनी सांगितलं की, त्यांची आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांच्या गुणांचं मिश्रण असलेली मुलगी त्यांना पत्नी म्हणून आवडेल...आता अशा क्वालिटीज् एकाच मुलीमध्ये सापडणं तसं अवघड काम आहे...सॅम पित्रोदा हे राजीव गांधी यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत...तर सध्या ते आंतरराष्ट्रीय स्तरावर काँग्रेस पक्षसंघटेशी निगडीत सगळ्याच जबाबदाऱ्या पार पाडत असतात... पित्रोदा यांच्या या मुलाखतीतून एक गोष्ट स्पष्ट होतेय की, राहुल गांधी यांना लग्न करून संसार थाटायचा आहे...अर्थात हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा इंदिरा गांधी आणि सोनिया यांच्या गुणांचं मिश्रण असलेली मुलगी सापडली तर...
(https://www.youtube.com/results?search_query=sam+pitroda+on+rahul+gandhi+marriage )
राहुल गांधी हे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रसिद्ध असल्यानं त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यात कुठंही साजेशी मुलगी सहज भेटली असती. राहुल गांधी जेव्हा कधी परदेशात जातात तेव्हा विरोधकांकडून त्यांच्या वेगवेगळे आरोप होतात...त्यात राहुल गांधी मैत्रिणीला भेटायला किंवा मजा मारायला परदेशात जातात इथपर्यंत आरोपांची पातळी गेलेली असते. आणि त्याला कारणही तसंच आहे कारण राहुल गांधींनी अजून लग्न केलेलं नाही...
लोकसभेच्या निवडणुकीला ७ ते ८ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे...त्यामुळं एकीकडे INDIA या विरोधकांच्या आघाडीला मजबूत करून २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांना ही आघाडी सामोरं जाणार आहे...तर दुसरीकडे ही आघाडी बनण्याच्या आधीच पाटणा इथं २३ जून रोजी झालेल्या विरोधकांच्या बैठकीत राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी तर चक्क पत्रकार परिषदेतच राहुल गांधी यांना लग्नाविषयी विचारणा केली...पाहूयात लालू प्रसाद यादव नेमंक काय म्हणाले होते ते ... (लालू प्रसाद यादव यांचा आणि राहुल गांधींचा बाईट वापरणे )
(https://www.youtube.com/watch?v=CFcCZmtGELY)
लालूप्रसाद यादव राहुल गांधींना म्हणाले, “ लग्नाविषयी मी राहुल गांधींना सल्ला दिला होता. मात्र त्यांनी तो ऐकला नाही...लग्न करायला पाहिजे होतं...अजूनही वेळ गेलेली नाही...लग्न करून घ्या...माझं म्हणणं ऐका...तुमची आई माझ्याकडे तक्रार करते की, तुम्ही तिचं म्हणणं ऐकत नाही...तुम्ही लग्न करत नाही...त्यानंतर राहुल गांधींनी लालूप्रसाद यांना सभ्य भाषेत सांगितलं की, “ तुम्ही म्हटलं म्हणजे लग्न होऊन जाईल”…आणि इथंच राहुल य़ांनी लग्नाचा विषय संपवला...
आता पुन्हा राहुल गांधींनी स्वतःच एक व्हिडिओ शेअर केलाय...या व्हिडिओमध्ये हरियाणातील काही महिलांनी राहुल, प्रियंका आणि सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेतली. या भेटीमध्ये एका महिलेनं थेट सोनिया गांधींनाच राहुल यांचं लग्न करण्याविषयी विचारणा करते...त्यावर सोनिया गांधी म्हणतात, “ तुम्हीच मुलगी बघा”. तर दुसरीकडे राहुल गांधी स्वतःच म्हणतात, “ लग्न होऊन जाईल”… (https://www.youtube.com/watch?v=E2T7UuZqHzg)
या दोन्ही घटना बघितल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की, राहुल गांधी यांनी लग्न करणारच नाही, असं कधीही, कुठेही म्हटलेलं नाही...मग प्रश्न असा निर्माण होतो की, वयाच्या ५३ व्या वर्षांपर्यंत राहुल यांना एकही सुयोग्य मुलगी लग्नासाठी साप़डली कशी नाही ? आई म्हणून सोनिया गांधी बहिण म्हणून प्रियंका गांधींनी राहुल यांच्या लग्नासाठी विशेष प्रयत्न का केले नाहीत ? अशा प्रश्नांचं एकच उत्तर आहे ते म्हणजे जोपर्यंत राहुल गांधी स्वतः लग्नासाठी तयार होत नाहीत, तोपर्यंत असे प्रश्न वारंवार उपस्थित केले जाणारच आहेत. भारत जोडो सारखी ऐतिहासिक यात्रा आणखी ऐतिहासिक करण्याची राहुल गांधींना सुवर्णसंधी होती...कारण या दरम्यान लाखो लोकांना राहुल गांधी भेटले...यात अविवाहित मुलींचीही संख्या मोठ्या प्रमाणावर होती...त्यापैकी कुणीही राहुल यांच्यासोबत सहज लग्नाला तयार झाली असती...
असो...आता पुढचा मुद्दा हा आहे की, लग्न खरोखरच इतकं महत्त्वाचं आहे का ? यावर जर मतदान घेतलं तर ९० टक्क्यांपेक्षा अधिक लोकं हो लग्न महत्त्वाचंच आहे, असं उत्तर देतात...त्यातही राजकीय कुटुंब असेल आणि नेतृत्व पुरूषाकडे असेल तर वंशाला जसा दिवा लागतो तसाच पक्षालाही वारसा लागतो, या जाणिवेतून काँग्रेसमधील बहुतांश जणांना राहुल गांधी यांनी लग्न करावं असंच वाटतंय...तर दुसरीकडे गांधी नावाचा मोठा इतिहास आहे...त्यामुळं हा इतिहास पुढे नेण्यासाठी राहुल गांधींचं लग्न होणं गरजेचंच आहे, असाही एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे...त्यामुळं राहुल गांधींच्या बाबतीत लग्न हा महत्त्वाचा विषय ठरतो...आता गांधींचा वारसा पुढे चालवायचा असेल तर वयाच्या ५३ व्या वर्षी लग्न करून तो पुढे जाणार असेल तर त्या लग्नाला अर्थ आहे...शिवाय राहुल गांधी यांच्या उतारवयात त्यांना जवळचा आधार म्हणूनही पत्नीची आवश्यकता असेल...अशावेळी खासगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही पातळ्यांवर राहुल गांधींसाठी लग्न करणं हे आवश्यक आहे...मात्र, समजा त्यांनी लग्न केलंच नाही तर काय होऊ शकतं...असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे...तर त्याचंही उत्तर अगदी साधं सोप्प आहे...समजा त्यांनी लग्न केलंच नाही तर ते आजच्या सारखंच पूर्णवेळ पक्ष संघटनेसाठी देऊ शकतात, त्याचा फायदा काँग्रेसला नक्कीच होऊ शकतो...आणि समजा त्यांनी लग्न केलं तरी ते राजकारणात सक्रिय राहूनही सुखानं संसार करू शकतात, असं चित्र आहे...
राहुल गांधींची खासदारकी रद्द होण्याआधी ते एकटे राहत होते. मात्र, खासदारकी रद्द झाल्यानंतर ते आई सोनिया गांधी यांच्यासोबत राहायला गेले आहेत. आता सोनिया गांधी यांचं वय आणि त्यांच्या शारिरीक मर्यादा पाहता राहुल गांधी यांनी लग्न करायला पाहिजे, असा मतप्रवाहही काँग्रेसमध्ये आहेच...अर्थात या सगळ्या गोष्टींची राहुल गांधींनाही पुरेपूर कल्पना आहेच...त्यामुळं राहुल यांनी मनावर घेतलंच तर कुठल्याही क्षणी लग्न करू शकतात...आणि Most Eligible Bachelor या टॅगपासून सुटका करून घेऊ शकतात...