Beed News : देशामध्ये लोकसभा निवडणुकीला सर्वात महत्त्वाची निवडणूक मानली जाते यामध्येच महाराष्ट्र राज्य हे निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाचं राज्य म्हणून देशांमध्ये महाराष्ट्राकडे पाहिलं जातं, त्यातच बीड जिल्ह्यात गेले काही दिवसापासून सत्ता परिवर्तन झालं आणि अनेक महाविकास आघाडीचे नेते भाजप चे घटक पक्ष म्हणून सध्या राज्यांमध्ये काम करत आहेत अनेक मातब्बर नेते भाजपने आपल्या पक्षात घेतले आहेत त्यामुळे राज्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीला महत्त्व आलं आहे, त्यातच राज्यामध्ये शिवसेनेच्या दोन शिवसेना केल्या त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर शिंदे गट ही दुसरी शिवसेना उभी केली त्यानंतर काही दिवसातच राष्ट्रवादीचे दोन गट झाले एक गट भाजपला जाऊन मिळाला त्यामुळे शरद पवार हे अडचणीत सापडले आहेत अजित पवार गट भाजपला जाऊन मिळाल्याने राज्यात मोठे बदल झाले आणि माताब्बर नेते भाजपमध्ये आल्याचे चित्र आपण पाहत आहोत. मात्र बीडमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे लोकसभेचे उमेदवार कोण? खासदार प्रीतम मुंडे की, पंकजाताई मुंडे?, व महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार कोण...? राष्ट्रवादीला या पडतीच्या काळात सर्वात जास्त आधार देण्याचे काम आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं आहे आणि यांचंही नाव या चर्चेत आहे, जयसिंग गायकवाड, त्यानंतर किशोर काळे, ईश्वर मुंडे, सुशीला मोराळे, अशी अनेक नावे महाविकास आघाडीकडे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत, मात्र राज्यात भाजपची सत्ता असल्याने बीडचे भाजपच्या संभाव्य उमेदवार नेमक्या कोण असणार कारण गेली अनेक दिवसापासून आपण पाहतो की जे नेते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनीच घडवले आणि तेच नेते त्यांच्याच विरोधामध्ये उभे राहिले.
2009 ते 2019 कसा झाला संघर्ष...!
2009 गोपीनाथ मुंडे विरुद्ध रमेश आडसकर
गोपीनाथ मुंडे(भाजपा) यांना 5 लाख 53 हजार मतं मिळाली होती तर रमेश आडसकर (राष्ट्रवादी) यांना 4 लाख 13 हजार मते मिळाली होती,
त्यानंतर 2014 मध्ये भाजपकडून गोपीनाथ मुंडे(भाजपा) विरुद्ध सुरेश धस(राष्ट्रवादी) यांच्यात संघर्ष झाला होता गोपीनाथ मुंडे(भाजपा) यांना 6 लाख 35 हजार मते मिळाली होती, तर सुरेश धस (राष्ट्रवादी) यांना 4 लाख 99 हजार मते मिळाली होती, निवडणुका झाल्यानंतर काही दिवसातच स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झालं आणि पोट निवडणूक झाल्यात्यावेळेस राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं होतं की मुंडे यांचा जर उमेदवार असेल तर मी त्यावेळेस त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही मात्र त्यावेळेस कोणाला उमेदवारी देणार हा प्रश्न होता मात्र त्यावेळेस प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली या फोटो निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे विरुद्ध अशोकराव पाटील हा संघर्ष झाला होता त्यावेळेस खासदार प्रीतम मुंडे यांना 9 लाख 22 हजार मते मिळाली होती तर अशोक पाटील (काँग्रेस) यांना 2 लाख 20 हजार मते मिळाली होती आणि प्रीतम मुंडे यांचा विजय झाला होता.
त्यानंतर 2019 मध्ये भाजपकडून प्रीतम मुंडे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आणि त्यावेळेस राष्ट्रवादीकडून त्यांच्या विरोधात बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली मात्र प्रीतम मुंडे यांनी अनेक कामे केल्यामुळे प्रीतम मुंडे (भाजपा)या 6 लाख 78 हजार मतांनी निवडून आल्या तर बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी )यांना 5 लाख 9 हजार मतांनी मिळाली होती,
आणि खासदार प्रीतम मुंडे या सर्वात जास्त मताधिक्याने देशांमध्ये निवडून गेल्या होत्या, मात्र यावेळेस या भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार बीड जिल्हा हा नेत्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो यामध्ये सर्वात वजनदार नेते म्हणून सध्याचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिले जात त्यानंतर प्रकाश सोळुंके, सुरेश धस,अमरसिंह पंडित, बाळासाहेब आजबे, नमिता मुंदडा, लक्ष्मण पवार, जयदत्त क्षिरसागर, संदीप क्षीरसागर, बदामराव पंडित, संगीता ठोंबरे, भीमराव धोंडे असे अनेक मातब्बर नेते या बीड जिल्ह्यात आहेत आणि या नेत्यांच्या भोवती राजकारण फिरत आहे आणि यामध्ये काही पडद्यामागचे कलाकार देखील आहेत त्यामुळे यावेळेस बीड जिल्ह्यात भाजप कडून पंकजा मुंडे की प्रीतम मुंडे तर राष्ट्रवादीकडून जयसिंग गायकवाड, संदीप क्षीरसागर, डॉ, किशोर काळे, ईश्वर मुंडे, सुशीला मोराळे हे संभाव्य उमेदवार आहेत त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार...?