मोदींवर 'ही' वेळ का आली?
मोदींवर ‘ही’ वेळ का आली? What is reason behind repeal of farm laws;
5 राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकांच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना आपण तीन कृषी कायदे रद्द करत असल्याचं सांगितलं. मात्र, जे मोदी आपल्या निर्णयावर ठाम असतात. कोणताही निर्णय घेतल्यानंतर मागे घेत नाही. '56 इंच' की छाती म्हणून त्यांच्या निर्णय घेण्याच्या शैलीचा उल्लेख केला जातो. त्या नरेंद्र मोदी यांच्यावर कायदे परत घेण्याची वेळ का आली?
या संदर्भात मॅक्समहाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अशोर वानखेडे आणि अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस अजित नवले यांच्याशी बातचीत केली पाहा... तीन कृषी कायदे रद्द करण्याची वेळ मोदींवर का आली?