'ईडी'च्या जाळ्यात अडकलेल्या अजय बाहेतीची पॉलिटिकल कनेक्शन काय?

Update: 2021-06-28 10:26 GMT

राज्यभर गाजलेल्या नांदेडच्या नायगाव, कृष्णूर येथील धान्य घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने उडी घेतल्यानंतर मुख्य आरोपी असलेल्या इंडिया अँँग्रो अनाज लिमिटेड कंपनीचा मालक अजय बाहेती याच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगअंतर्गत गुन्हा नोंदवत ईडीने त्याला अटक केली. शुक्रवारी न्यायालयाने त्याला ८ दिवसांची कोठडी सुनावली आहे. पाचशे कोटी पेक्षा जास्त मोठी व्याप्ती असलेला या घोटाळ्याच्या निमित्ताने अनेक अधिकारी आणि राजकारण्यांचे धाबे दणाणले आहेत.

नांदेड,परभणी, लातूर अशा मराठवाड्यातील मोठ्या भागात प्रस्थ असलेले अजय बाहेती व्यापारी आहेत.नांदेडच्या नायगाव, कृष्णूर येथील एमआयडीसीमध्ये अजय बाहेती यांची इंडिया अँँग्रो अनाज लिमिटेड नावाची कंपनी आहे. बाहेती हा अन्नपुरवठा विभाग व धान्य वितरण करणारी यंत्रणेला हाताशी धरून शासकीय वितरणाचा गहू व तांदूळ चोरीच्या मार्गे थेट आपल्या कंपनीत उतरवून घेत होता.


त्यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या कंपनीमध्ये धान्याची अवैध वाहतूक होत असताना ११ ट्रक पकडण्यात आले. कुंटूर पोलीस ठाण्यात ११ ट्रकचालकासह मुख्य आरोपी अजय बाहेती, व्यवस्थापक ओमप्रकाश तापडिया, वाहतूक कंत्राटदार राजू पारसेवार आणि ललित खुराणा यांच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे हा तपास सीआयडीकडे देण्यात आला. त्यात बाहेतीसह १९ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सध्या महाराष्ट्र मध्ये ठीक ठिकाणी धडक कारवाई सुरू केले आहेत.

इतक्या दिवस थंडबस्त्यात असलेल्या मोठ्या प्रकरणा मध्ये जामीनावर असलेल्या बाहेतीविरुद्ध गुन्हा नोंदवत ईडीने त्यांना अटक केली. या घोटाळ्यात फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची २८ गोडावून आणि तीन हजार रेशन दुकानांचा सहभाग आहे. तसेच अनोळखी सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांसह दलाल, व्यावसायिकांचाही यात सहभाग असल्याचा संशय असल्याची माहिती ईडीकड़ून देण्यात आली. त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याचेही ईडीने प्रसिद्धीपत्रकात नमूद केला आहे.

बाहेती याला अटक झाल्यामुळे अनेक पुरवठा अधिकारी तहसीलदार तसेच राजकीय बॉस देखील अडचणीत आले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तत्कालिन आघाडी सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठामंत्री देखील होते. बाहेती यांच्या कारवाई मध्ये अनिल देशमुख यांचेही कनेक्शन सूत्रांकडून सांगितले जात आहे.


बाहेती यांच्या कृष्णुर इथल्या इंडिया मेगा या कंपनीने शेकडो शेतकऱ्यांना देखील फसवलंय. शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून त्यांचे पैसे बुडवून बाहेती महिना भरापासून फरार आहे. आपले पैसे मिळावेत म्हणून शेतकऱ्यांनी कंपनीबाहेर आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ही केले. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. आता तर धान्य घोटाळ्याचा तपास ED कडे गेल्याने शेतकऱ्यांचे पैसे कसे मिळतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Tags:    

Similar News