आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ? वाचा सविस्तर
लोकसभेच्या आगामी निवडणूकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीची आज मुंबईची महत्वाची बैठक पार पडली. जागा वाटपाबाबत आजच्याही बैठकीत काही तोडगा निघालेला नाही. महाविकास आघाडीचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत की, वंचित बहुजन आघाडीने आमच्या सोबत यावे. जागा वाटपाबाबत अद्याप ठोस निर्णय झाला नसला तरी आज ची बैठक सकारात्मक झालेली आहे, या बैठकीच्या चर्चेत राहिलेल्या उर्वरीत मुद्दयांवर तिन्ही पक्षांच्या अंतर्गत चर्चा होतील.
दरम्यान बैठक संपण्याआधीच प्रकाश आंबेडकर बाहेर आले, त्यावेळी माध्यमांशी बोलाताना म्हणाले की, बैठकी दरम्यान झालेल्या अंतर्गत चर्चेतल्या या मुद्द्यांमध्ये आणखी काही मुद्दे सामील करायचे असल्यास ते केले जातील. त्यानंतर एक ड्राफ्ट तयार होईल. इतर मुद्द्यांवरील चर्चा ही सुरू राहील. मला काही बाहेर कामानिमित्त जायचे आहे त्यामुळे मी निघालो आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
शेवटी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये, याची दक्षता घेण्याचं आम्ही ठरवलं आहे. त्यामुळे जागावाटप हे दुसऱ्या टप्प्यात ठरवलं जाईल. त्याआधी कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा होणार आहे. इंडिया आघाडी आता शिल्लक राहिलेली नाही. आमचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचा भाग होण्याचा विषय नाही.