West Bengal Assembly Election: चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू… आजचा दिवस ममता बॅनर्जींसाठी महत्त्वाचा
चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू… आजचा दिवस ममता बॅनर्जींसाठी का आहे महत्त्वाचा?;
देशात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा मतदार संघासाठी एकूण आठ टप्प्यात मतदान होत आहे. आज (शनिवारी) सकाळी ७ वाजता चौथ्या टप्प्यातील ४४ जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून हे मतदान सायंकाळी ६:३० वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत टक्के मतदान पार पडले आहे. आतापर्यंत तीन टप्प्यांतील मतदान पार पडलं आहे. चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी १५,९४० मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस यांच्यात जंगी सामना पाहायला मिळतोय.
चौथ्या टप्प्यात महिला मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण या टप्प्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. एकूण मतदारांची संख्या १,१५,८१,०२२ आहे. त्यापैकी महिला मतदारांची संख्या १५,७०,३९२ तर पुरुष मतदारांची संख्या १५,६६,१६१ आहे. त्यामुळे महिलांची भूमिका महत्वाची असणारेय.
चौथ्या टप्प्यातील मतदान कोणकोणत्या मतदारसंघात..?
पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यात ४४ जागांवर मतदान होत आहे. यामध्ये मॅक्लिगंज, माथाभांगा, कूच बिहार (उत्तर), कूच बिहार (दक्षिण), सीतलकुची, सीताई अप्रिल, दिनहाटा अप्रिल, नटबरी, तूफानगंज, कुमारग्राम, कालचिनी, अलीपुरद्वार, फलकटा, मदारीहाट, सोनारपूर दक्षिण, भांगर, कस्बा, जाधवपूर, सोनारपूर उत्तर टॉलीगंज, बेहाला पुरबा, बेहला पश्चिम, महेशताला, बज बज, मटियाबुर्ज, १६९ बॅली, हावडा उत्तर, हावडा मध्य, शिबपूर, हावडा दक्षिण, संकरील, पंचला, उलूबेरिया पुरबा, दोम्जुर, उत्तरपारा अप्रिल, श्रीरामपूर, चांपदानी, सिंगूर, चंदननगर, चुंचुरा, बालागढ, पंडुआ, सप्तग्राम आणि चंदीताला या मतदारसंघांचा समावेश आहे.
पश्चिम बंगाल निवडणुकांचे वेळापत्रक
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021-294 मतदारसंघ
- पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान होणार.
- पहिला टप्पा : २७ मार्च रोजी मतदान पार पडले
- दुसऱ्या टप्पा : १ एप्रिल रोजी मतदान पार
- तिसरा टप्पा : ६ एप्रिल रोजी मतदान पार
- चौथा टप्पा : १० एप्रिल रोजी मतदान सुरू आहे.
- पाचवा टप्पा : १७ एप्रिल रोजी मतदान
- सहावा टप्पा : २२ एप्रिल रोजी मतदान
- सातवा टप्पा : २७ एप्रिल रोजी मतदान
- आठवा टप्पा : शेवटचा टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी पार पडेल.