मोठ्या कष्टातून उभा केलेल्या राष्ट्रवादी पक्षाला घरभेदी होऊन अजित पवारांनी सुरुंग लावला. आता काय करायचे त्या राष्ट्रवादी विचारधारेचे? पक्षाशी ध्रुव करणाऱ्या अजित पवारांना आता माफी नाही. नरेंद्र मोदींनी त्यांना वाराणसी काशी मधून उभे करावे आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात नांदेडहून आलेले कार्यकर्ते अश्विन कुमार क्षीरसागर यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.