Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा जलवा कायम, भाजप जोरदार मुसंडी मारणार

Update: 2021-04-29 15:28 GMT

कोरोना काळात 5 राज्यात झालेल्या निवडणुकीचा निकाल 2 मेला लागणार आहे. मात्र, सर्व देशवासियांचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्ता राखणार का? की नरेंद्र मोदी यांची जादू चालणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना निवडणुकांचे Exit Poll चे आकडे ममता बॅनर्जींच्या बाजूने कौल देताना दिसत आहेत. आज पश्चिम बंगालच्या 8 टप्प्यातील निवडणूक संपल्यानंतर निवडणूकीचे Exit Poll समोर आले आहेत.

सी व्होटरच्या एग्जिट पोल नुसार पश्चिम बंगाल मध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी सत्ता मिळवताना पाहायला मिळत आहे. सी व्होटरच्या सर्व्हेनुसार ममता बॅनर्जी च्या टीएमसी पक्षाला 294 जागांपैकी 158 जागा मिळू शकतात. तर दुसरीकडे भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसून येत आहेत. भाजपला 115 जागांवर विजय मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागच्या निवडणुकीत भाजपला या राज्यात फक्त 3 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळं पश्चिम बंगालमध्ये भाजप मोठी मुसंडी मारताना दिसत आहे.

सी व्होटर च्या सर्व्हेक्षणानुसार पश्चिम बंगाल मध्ये भाजप आणि टीएमसी या पक्षांच्या व्यतिरिक्त कॉग्रेस आणि लेफ्टने एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. या दोनही पक्षाला फक्त 9 जागा मिळताना दिसत आहेत. इतर अपक्षासाठी 1 जागा दाखवण्यात आली आहे. व्होट शेयर चा विचार केला तर टीएमसीला या वेळेस 42.1 टक्के इतकी मत मिळतील. तर भाजपला 39.2 टक्के इतकी मत मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. कॉंग्रेस आणि लेफ्टचा विचार केला तर या दोनही पक्षाच्या गटबंधन ला 15.4 टक्के मत मिळण्याचा अंदाज आहे. तर इतर अपक्षांना 3.3 टक्के इतके मत मिळतील. असं Exit poll मध्ये म्हटलं आहे.

मागच्या निवडणूकीत व्होट शेअरचा विचार केला तर टीएमसीला 44.9 टक्के इतकी मत मिळाली होती. तर भाजपला फक्त 10.2 टक्के इतकी मत मिळाली होती. कॉंग्रेस आणि लेफ्ट चा मतदानाचा टक्का 37.9 टक्के इतका होता. आता तो 15.4 टक्के इतका राहिल असा अंदाज व्यक्त केला आहे.

तर दुसरीकडे रिपब्लिक-सीएनएक्स च्या एग्जिट पोलनुसार भाजपला या ठिकाणी 138 ते 148 जागा मिळत असल्याचं दिसून येत आहे. तर टीएमसीला 128 ते 138 जागा मिळत असल्याचा अंदाज आहे.व्होट शेअर चा विचार केला असता भाजपचा व्होट शेअर 42.75 टक्के इतका राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी टीएमसीचा व्होट शेअर 40.07 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सर्व्हेक्षणानुसार लेफ्ट-कॉग्रेसच्या गठबंधनला 14.42% आणि इतर पक्षांना 2.76 टक्के मत मिळतील असा अंदाज आहे.

Tags:    

Similar News