माणुसकीच्या भावनेतून पिण्यासाठी मराठवाड्याला पाणी दिलं जाईल - पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
उत्तर महाराष्ट्रचं पाणी मराठवाडातील जायकवाडी धरणाला देण्यावरून दोन विभागाच्या लोकप्रतिनिधीमध्ये संघर्ष सूरू आहे. उत्तर महाराष्ट्रातील धरणाचं पाणी मराठवाड्यासाठी सोडावं यासाठी सुप्रीम कोर्टात ही वाद सुरु आहे. हा वाद होणार नाही, याठिकाणी माणुसकीच्या भावनेतून पिण्याच्या पाण्याचा विचार केला जाईल. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा लोकप्रतिनिधीच्या मागण्याचा विचार केला जाईल अशी भूमिका पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली आहे.