Uttarakhand Exit Poll: उत्तराखंडमध्ये काँग्रेस की भाजप? कोण मारणार बाजी?

पाच राज्याच्या निवडणूकांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज Exit Poll ने या पाच राज्यात कोणाचं सरकार येणार याचा अंदाज व्यक्त केला आहे.;

Update: 2022-03-07 17:36 GMT

पाच राज्यातील निवडणूकांचा रणसंग्राम पार पडला. मतदान संपल्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. तर १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र त्यापार्श्वभुमीवर विविध संस्थांनी देशभरातील पाचही राज्यात कोण सरकार स्थापन करणार याबाबत दावे केले आहेत.त्यामुळे उत्तराखंडची सत्ता कोणाकडे जाणार याबाबत एग्झिट पोलमधून दावे करण्यात आले आहेत. 

पाच राज्याच्या निवडणूकांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज Exit Poll ने या पाच राज्यात कोणाचं सरकार येणार याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर ७० जागा असलेल्या उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाळ २३ मार्च रोजी संपत आहे. उत्तराखंडमध्ये १४ फेब्रुवारी ला ६५ टक्के मतदान पार पडले होते.


२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ५७ जागा जिंकून प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केले, तर विरोधी पक्ष काँग्रेसला केवळ ११ जागा मिळाल्या. भाजप ने सुरूवातीला त्रिवेंद्रसिंग रावत यांना मुख्यमंत्री केले होते. मात्र त्यांना चार वर्षांतच काढत भाजपने पहिल्यांदा तीरथसिंग रावत आणि त्यानंतर काही महिन्यांनी पुष्कर सिंह धामी यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री केले होते. उत्तराखंड मध्ये सत्ता मिळवण्यासाठी ३६ जागा जिंकणे गरजेचं आहे.

सीवोटर च्या एग्जिट पोल नुसार बीजेपी ला 41 टक्के, कांग्रेस ला 39 टक्के मत मिसळण्याचा अंदाज आहे. तर आम आदमी पक्षाला केवळ 9 टक्के मतदान मिळण्यास अंदाज आहे. याचा अर्थ उत्तराखंड मध्ये बीजेपी ला मतदान जादा आणि जागा कमी मिळण्याची शक्यता आहे.

एबीपी न्यूज सीवोटर च्या एग्जिट पोल नुसार उत्तराखंड मध्ये काँग्रेस ला 32-38 आणि भाजपला 26-32 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर आमआदमी पार्टी ला 02 जागा आणि इतर अपक्षांना 3-7 जागा मिळू शकतात.

त्यामुळे एबीपी न्यूज-सीवोटर च्या एग्जिट पोल नुसार उत्तराखंड मध्ये काँग्रेस ची सत्ता येत आहे.


Tags:    

Similar News