अखेर कमला हॅरीस यांनी केलं मोदींबाबत ट्विट..

सध्या अमेरीकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहि्ल्या दिवसापासून सोशल मिडीयाच्या चर्चेत आहे. प्रवासात फाईल्सवर काम करताना त्यांचा फोटो ट्रोल झाल्यानंतर अमेरीकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांच्या सोबतचे लॉबीमधील चर्चेचे फोटो त्यांनी सोशल मिडीयात शेअर केले होते.

Update: 2021-09-24 15:43 GMT

मोदींनी ट्विट केलं असलं तरी कमला हॅरीस यांच्या सोशल मिडीयावर मोदी कुठेच दिसत नव्हते. मोदींच्या अमेरीकावारीवरुन अमेरीकेतील प्रसारमाध्यमं देखील वृत्तांकन केले नव्हते. आज दिवसभर सोशल मिडीयात याबद्दल वाद-प्रतिवाद सुरु होते. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरीकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांची आज संयुक्त पत्रकार परीषद पार पडली. त्यानंतर त्यांनी ट्विट करुन https://twitter.com/VP/status/1441413864869007366?s=19

अमेरीक भारताचे द्विपक्षीय सहकार्य सुरुच राहील. एकत्र काम करुन प्रगती करु. जागतिक समस्या कोविड-१९, हवामान बदल आणि लोकशाही रक्षणासाठी कटिबध्द राहू असं कमला हॅरीस यांच्या उपराष्ट्रपती कार्यालयानं केलेल्या ट्विट मधे म्हटलं आहे.

Tags:    

Similar News